झेप फाउंडेशनतर्फे निबंध स्पर्धा
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : झेप फाउंडेशन शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शालेय गटासाठी रत्नागिरी तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ जानेवारीपर्यंत निबंध पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धा गट क्र. १ (इ. ५वी ते ७वी) साठी ‘प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व किंवा ‘मी भारतीय संविधान बोलत आहे’ असे विषय आहेत. गट क्र. २ (इ. ८वी, ९ वी) साठी ‘मी लोकप्रतिनिधी झालो तर...’ किंवा ‘प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची माजी कल्पना’ असे विषय आहेत. प्रथम पारितोषिक २२२२ रुपये, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक १५५५ रुपये, चषक व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक ११११ रुपये, चषक व प्रमाणपत्र, सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी एका विषयावर स्वहस्ताक्षरात व कागदाच्या एका बाजूला निबंध लिहावा, दोन्ही गटासाठी शब्दमर्यादा ७०० शब्द आहे. स्पर्धकाने स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता व पालकांचा मोबाईल नंबर स्वतंत्र कागदावर लिहून सोबत जोडावा. निबंध अॅप्पल ब्लॉसम, रामआळी, रत्नागिरी येथे पोहचतील. स्पर्धेतील पहिल्या तीन क्रमांक प्राप्त विजेत्यांना संपर्क नंबराद्वारे कळवले जाईल. बक्षीस वितरण समारंभाची तारीख, ठिकाण व वेळ आयोजकांतर्फे कळवण्यात येईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष परशुराम उर्फ दादा ढेकणे, सचिव सुनील पवार, सचिन गांधी यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.