कोकण

नाट्यस्पर्धेत कोरडीच्या ''दी रेन इन दी डार्क'' प्रथम

CD

-ratchl२४४.jpg
P२६O१९८३७
ः चिपळूण ः विजेत्या ‘दी रेन इन दी डार्क’ नाटकातील कलाकारांना गौरवताना मान्यवर.
------
कोरडी केंद्राचे ‘दी रेन इन दी डार्क’ प्रथम
नाट्यस्पर्धा ; महानिर्मिती आंतरविद्युत केंद्रातर्फे आयोजन, चंद्रपूर द्वितीय, भुसावळला तृतीय क्रमांक
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ ः पोफळी येथील कोयना जलविद्युत केंद्रात आयोजित महानिर्मिती आंतरविद्युत केंद्र नाट्यस्पर्धेत कोराडी केंद्राच्या ‘दी रेन इन दी डार्क’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. चंद्रपूरच्या नाटकाने द्वितीय आणि भुसावळने तृतीय क्रमांक मिळवला. शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात १९ ते २३ जानेवारीदरम्यान या स्पर्धा झाल्या.
नाट्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल (ता.२३) झाला. कार्यक्रमाला अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेत कोराडी औष्णिक विद्युतकेंद्राचे मिलिंद चन्ने दिग्दर्शित ‘दी रेन इन दी डार्क’ या नाटकाला प्रथम, महाऔष्णिक विद्युत केंद्र चंद्रपूरचे मकरंद परदेशी दिग्दर्शित ‘दी अनॉनिमस’ या नाटकाला द्वितीय आणि भुसावळ औष्णिक विद्युतकेंद्राचे राजेश पवार दिग्दर्शित ‘धुमस’ या नाटकाला तृतीय पारितोषिकाने गौरवण्यात आले. मिलिंद चन्ने यांना ‘दी रेन इन दी डार्क’ या नाटकासाठी दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक, राजेश पवार यांना ‘धुमस’ नाटकासाठी द्वितीय आणि शैलेंद्र पाटील यांना ‘बदाम सात’ नाटकासाठी तृतीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनय (पुरुष) यामध्ये सचिन मोडकवर यांना ‘बाजीराव’ या भूमिकेसाठी प्रथम, शैलेंद्र पाटील यांना ‘न्यूटन, आर्किमिडिज, शकुनी’ या भूमिकांसाठी द्वितीय, प्रवीण मोरे यांना ‘रंगा’ या भूमिकेसाठी तृतीय पारितोषिक मिळाले. उत्कृष्ट अभिनय (स्त्री) यामध्ये ओवी ढवळे यांना ‘जान्हवी’ या पात्रासाठी प्रथम क्रमांक, प्राची दाणी यांना ‘उषाक्का’ या पात्रासाठी द्वितीय तर सायली देठे यांना ‘छाया व प्रमिला’ या भूमिकेसाठी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. लक्षवेधी अभिनय (पुरुष) यामध्ये ‘काळनाथ’ या भूमिकेसाठी महेश होनमाने यांना तर लक्षवेधी अभिनय (स्त्री) यामध्ये ‘आई व शकुंतला’ या भूमिकेसाठी रूपाली बोंबारे यांना पारितोषिक मिळाले. नेपथ्यासाठी पारितोषिक दिगंबर इंगळे (प्रथम), रोशन वाघ (द्वितीय) आणि संदीप हिवरखेडकर (तृतीय) यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. प्रकाशयोजनेसाठी सचिन डांगोरे व धनराज गावनेर (प्रथम), अतुल बऱ्हाटे (द्वितीय) आणि महेश तुपे व विशाल जाधव (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. या वेळी महानिर्मितीचे पुरूषोत्तम वारजूरकर, संजय चोपडे, निवृत्ती कोंडावळे, संतोष चव्हाण, मच्छिंद्र गायकवाड, रोहिदास आव्हाड, प्रसाद निकम, माधुरी मुंडले, संतोष पुरोहित, सुनील विचारे उपस्थित होते.
---
चन्ने, मेश्राम, झिरमुटे, उफाडे, धानजी प्रथम
नाट्यस्पर्धेत संगीतासाठी मिलिंद चन्ने व सुनील मेश्राम (प्रथम), शिवाजी बोरकर व प्रियांका धंदर (द्वितीय), मोहित कांबळे (तृतीय) यांना पारितोषिक मिळाले. रंगभूषा व वेषभूषेसाठी गीतांजली झिरमुटे, रूपाली उफाडे व मानसी धानजी (प्रथम), ज्योती चंद्रमोरे (द्वितीय) आणि निकिता गोटे, चित्रा इंगळे(तृतीय) यांना पारितोषिक मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT