चिखलगाव टपाल कार्यालयात
अपहार प्रकरणी एकावर गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ ः तालुक्यातील चिखलगाव (ता. दापोली) येथील टपाल कार्यालयात कार्यरत असताना खातेदारांच्या रकमेत अपहार केल्याप्रकरणी आउटसाइड शाखा डाकपालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ जुलै ते १७ ऑगस्ट २०२० या कालावधीत घडल्याचे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी गुहागरचे डाकघर निरीक्षक हिमांशू हरिश्चंद्र जोशी (वय २६) यांनी दाभोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, संशयित सोनिया संदेश तेलप (वय २६) या चिखलगाव टपाल कार्यालयामध्ये आउटसाइड शाखा डाकपाल म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी तीन खातेदारांच्या खात्यातून रक्कम काढून अपहार केल्याचे जोशी यांनी तक्रारीत म्हटले आहे. घडवते, शिगवण व कांबळे या तीन टपाल खातेदारांच्या खात्यातील एकूण ३६ हजार ६०० रुपये काढून रकमेचा वैयक्तिक वापर करत शासनाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दाभोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.