-rat२४p११.jpg-
P२६O१९८०७
रत्नागिरी ः कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेले घुबड.
------
दुर्मिळ पांढऱ्या घुबडाला जीवदान
मिऱ्या येथे कुत्र्याच्या तावडीतून सुटका; कोल्हापुरात उपचार सुरू
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : मिऱ्या येथील साळवी कुटुंबाने दुर्मिळ जातीच्या घुबड पक्ष्याला जीवदान दिले. जाकीमिऱ्या येथे पांढऱ्या रंगाचे घुबड भटक्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले होते. कुत्र्यांच्या हल्ल्यातून त्याला सोडवत त्याचा जीव वाचवला आणि हे घुबड वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ही घटना जाकीमिऱ्या येथे घडली. दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या घुबडावर कुत्र्यांनी हल्ला चढवला होता. ही बाब नजीकच राहणाऱ्या साळवी कुटुंबाच्या निदर्शनास आली. या वेळी सुधीर साळवी, प्रणिता साळवी आणि रूपेश सावंत यांनी तत्काळ धाव घेत कुत्र्यांच्या तावडीतून घुबडाची सुटका केली. यानंतर घुबडाला घरी घेऊन जात त्याच्या जखमा साफ केल्या. दुसऱ्या दिवशी साळवी यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घडला प्रकार सांगितला. शुक्रवारी दुपारी वनविभागाचे अधिकारी मिऱ्या येथे साळवी यांच्या घरी पोहचले. साळवी यांच्याकडून घुबडाचा ताबा घेत त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले आहे.
-----
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. या मोकाट कुत्र्यांची शाळकरी मुलांना धास्ती लागून राहिली आहे. याच मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात घुबडही जखमी झाले. या मोकाट कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.