कोकण

दापोलीतील दुचाकी चोरीप्रकरणी चोरट्याला अटक

CD

दुचाकी चोरट्यास अटक
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २४ ः शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून दुचाकीची चोरी प्रकरणी दापोली पोलिसांनी एका संशयित तरुणाला अटक केली. किरण संतोष हिलम (वय २२, रा. माणगाव-दत्तनगर, ता. महाड, रायगड) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती, जालगाव येथील रहिवासी जितेंद्र काशिनाथ चव्हाण यांनी दुचाकी २१ जानेवारीला सकाळी सुमारे ११ वा. रसिक रंजन नाट्यगृहाशेजारील दुकानासमोरील मोकळ्या जागेत उभी केली होती. काही वेळाने परत आल्यानंतर त्यांना दुचाकी दिसली नाही. याबाबत त्यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करून तपासाला गती देण्यात आली. सीसीटीव्हीमध्ये दिसणारा तरुण हर्णै येथे २३ जानेवारीला रात्री संशयास्पदरीत्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर चोरीस गेलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway helmet rule Kolhapur : कोल्हापूर महामार्गावर दुचाकीस्वारांना ‘नो हेल्मेट-नो एन्ट्री’, १६ मार्चपासून नियम लागू

'कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याची आजही लाज वाटते' श्रेया घोषाल हिचं वक्तव्य, म्हणाली...'तशी गाणी...'

India vs England: वानखेडेवर महासंग्राम! सलग दुसऱ्या अंतिम फेरीसाठी भारत सज्ज; धोकादायक इंग्लंडविरुद्ध उपांत्य लढतीची उत्कंठा शिगेला

Latest Marathi News Live Update : देहूनगरीत आज संत तुकाराम महाराज यांचा 378 वा बीज सोहळा

Flight Ticket: वाढलेल्या तिकीट दरांमुळे विद्यार्थी त्रस्त; दुबईतील भारतीय दूतावासाने संपर्क न साधल्याने चिंतेत भर

SCROLL FOR NEXT