कोकण

रत्नागिरी- दस्तावेज पाहण्याची सुवर्णसंधी

CD

महात्मा गांधी व शास्त्री यांचे दुर्मिळ
दस्तावेज पाहण्याची सुवर्णसंधी
रत्नागिरी, ता. २५ : राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्याशी संबंधित दुर्मिळ पुराभिलेख, कागदपत्रे व ऐतिहासिक छायाचित्रांचे विशेष प्रदर्शन रत्नागिरीत आयोजित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय आणि गोगटे–जोगळेकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन येत्या २८ व २९ जानेवारी रोजी केले आहे. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्ट आवारात हे प्रदर्शन होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्याशी संबंधित मूळ पत्रव्यवहार, तत्कालीन नोंदी, छायाचित्रे यांसारखे दुर्मिळ ऐतिहासिक दस्तावेज नागरिकांना पाहता येणार आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा, राष्ट्रउभारणी आणि लोकशाही मूल्यांचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमास शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, शिक्षक, अभ्यासक, संशोधक, स्पर्धा परीक्षार्थी, इतिहासप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी व देशाच्या महान नेत्यांचे विचार आणि कार्य यांची प्रत्यक्ष ओळख करून घ्यावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे. इतिहासात रुची असलेल्या सर्वांसाठी ही एक महत्त्वाची व उपयुक्त संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. अधिक माहिती, शालेय गटभेटीचे नियोजन तसेच इतर तपशिलांसाठी इतिहास विभागप्रमुख डॉ. पंकज घाटे यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT