कोकण

रत्नागिरी- पालकांचा विश्वास कमवल्यास करिअरचा प्रवास सोपा

CD

rat25p2.jpg-
19940
रत्नागिरी : अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात चिन्मय भारती यांचा सत्कार करताना शंकर ढोले आणि पर्यवेक्षक विद्याधर केळकर, सोबत विभागप्रमुख शिल्पा तारगावकर.

पालकांचा विश्वास कमवल्यास करिअरचा प्रवास सोपा
उद्योजक चिन्मय भारतीः अभ्यंकर कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ : तंत्रज्ञानाच्या जगामध्ये नोकरी शोधाणारे न होता नोकरी निर्माण करणारे व्हा आणि त्यासाठी पालकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ आवश्यक असते. पालकांचा विश्वास कमवल्यास करिअरचा प्रवास सोपा आहे, असे प्रतिपादन उद्योजक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व सहसंस्थापक चिन्मय भारती यांनी केले.
अभ्यंकर- कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी शंकर ढोले स्टुडंट्स एनरिचमेंट सेल उपक्रमाअंतर्गत ते बोलत होते. उद्योजक भारती यांची उद्योजकता आणि भारतीय युवक या विषयावर मुलाखत घेण्यात आली.
मुलाखतीदरम्यान त्यांनी पटवर्धन हायस्कूल ते मुख्य तंत्रज्ञान अधिकारीपर्यंतचा प्रवास प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर मांडला. सार्था गवाणकर, स्वरांगी शेंबेकर, मयुरेश सावंत, मयंक खातू या विद्यार्थ्यांनी त्यांची मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांनी या वयात मल्टी टास्किंग असावे आणि नवनवीन कौशल्य आत्मसात करावी, अशा प्रकारची अपेक्षा शंकर ढोले यांनी मनोगतमध्ये व्यक्त केली.
या वेळी चिन्मय भारती यांचा श्रीफळ, पुष्पगुच्छ, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला प्रा. विद्याधर केळकर, सुप्रिया टोळ्ये उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्नेहा चव्हाण, नमोकार साठे, सोहम यळगुडकर, गार्गी केळकर, श्रुती पाळेकर या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. प्रस्तावना वाणिज्य विभागप्रमुख प्रा. शिल्पा तारगावकर यांनी केली. सूत्रसंचालन प्रा. प्रभात कोकजे यांनी केले. आभार मयुरेश सावंत यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Naik : भाजपनं एक इशारा दिला तर ठाण्यातून नामोनिशाण मिटवेन, गणेश नाईकांनी पुन्हा शिंदेंना डिवचलं

Snowstorm in America : अमेरिकेला हिमवादळाचा तडाखा! शेकडो विमान उड्डाणे रद्द; हजारो घरांचा वीजपुरवठा खंडित

Kolhapur ZP : महिला मतदारांना वाटायला आणलेल्या साड्या, साडे सहा लाखांचा माल जप्त; टेंपो कुणाचा?

प्रजासत्ताक दिनी Googleचं खास सरप्राइज! अनोखं डूडल पाहून तुम्हीही थक्क व्हाल, जाणून घ्या अर्थ

अभिषेक शर्मानं मोडला कॅनडाच्या क्रिकेटरचा विश्वविक्रम, २० चेंडूंच्या खेळीत प्रत्येक चेंडूवर काढली धाव

SCROLL FOR NEXT