कोकण

रत्नागिरी- विद्यार्थ्यांचे यश शाळेला अभिमानास्पद

CD

rat25p4.jpg-
19942
रत्नागिरी : राज्य चित्रकला परीक्षेत यश मिळवणाऱ्या फाटक हायस्कूलमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत प्रमुख पाहुणे.

विद्यार्थ्यांचे यश शाळेला
अभिमानास्पदः परुळेकर
‘फाटक’ मध्ये चित्रकारांचा सत्कार
रत्नागिरी, ता. २५ : चित्रकलेतून घडलेल्या विद्यार्थ्यांचे यश आणि कार्य शाळेला अभिमानास्पद असून शाळेचे नाव उज्ज्वल करणारे विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा शाळेला सार्थ अभिमान आहे, असे गौरवोद्गार दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब परुळेकर यांनी काढले. औचित्य होते फाटक हायस्कूलच्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेतील यशवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाचे.
या वेळी मंचावर संस्थेच्या कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर, उपाध्यक्ष विनय आंबुलकर, मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये, चित्रकला शिक्षक उपस्थित होते.
राज्य कला संचालनालयामार्फत घेण्यात आलेल्या ड्रॉईंगच्या एलिमेंट्री व इंटरमिजिएट या दोन्ही ग्रेड परीक्षांचा निकाल शंभर टक्के लागला. राज्य गुणवत्ता यादीत झळकलेली जान्हवी भोवड, अस्मी कानसे, तीर्था सागवेकर अन्विक्षा भेलेकर यांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते चित्रकला साहित्य व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कलाशिक्षक दिलीप भातडे आणि निलेश पावसकर यांचा संस्थेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार केला.
शासनाच्या कला उत्सवमध्ये त्रिमिती प्रकारात कोल्हापूर विभागाचे राज्यस्तरावर नेतृत्व करणाऱ्या आणि मागील वर्ष गुणवत्ता यादीत आलेल्या अस्मी होडेचा सत्कार करण्यात आला. पालक संजय भेलेकर यांनी शिक्षकांच्या कामाचे कौतुक करताना शाळेचे विशेष आभार मानले. प्रत्येक विद्यार्थ्यांचे काम गुणवत्ता यादीत येण्याच्या दर्जाचे असल्याचे कला शिक्षक दिलीप भातडे यांनी सत्कारला उत्तर देताना म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साताऱ्यात खळबळ! कराडच्या पाचुपतेवाडीत पुणे डीआरआयकडून छापेमारी, ६ हजार काेटींचे ड्रग्ज जप्त, कारखाना केला सील..

'मेगाब्लॉक होता, मग गाडी रद्द का केली नाही?' साडेचार तास एकाच ठिकाणी अडकली अजनी-पुणे 'वंदे भारत'; प्रवाशांचा संताप

उमेदवारांनो सावधान..! निवडणुकीच्या प्रचाराचा खर्च सव्वापाच ते साडेसात लाखांवर नकोच; चहा ८ रुपये, जेवण ७५ रुपये, बिर्याणी ७० रुपये अन्‌...

Republic Day 2026 Special Recipe: प्रजासत्ताक दिनासाठी परफेक्ट रेसिपी! तिरंग्याच्या रंगात रंगलेलं स्वादिष्ट सँडविच, लगेच ट्राय करा

Financial Independence : वैयक्तिक आर्थिक प्रजासत्ताकासाठी पाच संकल्प; आर्थिक स्वातंत्र्याची वाटचाल

SCROLL FOR NEXT