कोकण

बांदावासीयांचे समाजसेवेस नेहमीच प्राधान्य

CD

20016

बांदावासीयांचे समाजसेवेस नेहमीच प्राधान्य

प्रमोद कामत ः महायुतीकडून उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ ः बांदा जिल्हा परिषदेतून अनेकजण इच्छुक असताना मला संधी देत अनेकांनी पक्षासाठी त्याग केला. सुशांत पांगम यांनीही आपली उमेदवारी मागे घेतली. माझ्या समाजसेवेला बांदा जिल्हा परिषदेतील मतदारांनी दिलेली ही साथ असून मला बिनविरोध निवडून आणण्याऱ्या प्रत्येकाचा मी ऋणी आहे. सर्वांना सोबत घेऊन समाजसेवा व पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी सदैव तत्पर राहीन, असे प्रतिपादन बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती प्रमोद कामत यांनी येथे व्यक्त केले.
बांदा येथे आज महायुतीच्या जिल्हा परिषद व‌ पंचायत समितीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. श्री. कामत पुढे म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहे. लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी ऋणी असून ४० वर्षांपासून सुरू असलेली समाजसेवा अशीच कायम ठेवणार. पंचायत समितीत देखील महायुतीला यश मिळेल.’’
भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या, ‘‘महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना यश मिळेल. श्री. कामत बिनविरोध निवडून आले असून महायुतीच्या पंचायत समितीच्या उमेदवार रुपाली शिरसाट यांनाही यश मिळेल. केंद्र व राज्यातील सरकारचा फायदा गावाला होणार आहे.’’ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीने बांद्यात चांगले काम केले असून ग्रामपंचायत सदस्य म्हणून केलेल्या माझ्या कामास लोक पसंती देतील, असे उमेदवार रुपाली शिरसाट म्हणाल्या. रुपाली शिरसाट यांनी आपल्या प्रचाराचा प्रारंभ श्रीफळ वाढवून केला. बांदेश्वर मंदिर व ग्रामदैवत भूमिका देवीचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यानंतर घरोघरी जाऊन प्रचाराचा प्रारंभ केला. यावेळी माजी सभापती शितल राऊळ, उपसरपंच आबा धारगळकर, जावेद खतिब, तोरसे माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश सावळ, शिवसेना विभागप्रमुख भैय्या गोवेकर, बांदा माजी सरपंच अशोक सावंत आदींसह भाजप, शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT