सावरकर–टिळकांनी राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला
पद्मश्री मधुमंगेश कर्णिक ; नवनिर्माण शिक्षण संस्थेला भेट
रत्नागिरी, ता. २५ : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आणि पद्मश्री मधुमंगेश कर्णिक यांनी भेट दिली. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एसपी हेगशेट्ये महाविद्यालय आणि नवनिर्माण ज्युनिअर कॉलेज मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या अनुषंगाने मधु संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ही भेट अत्यंत भावनिक, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरली. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या वैचारिक व सांस्कृतिक परंपरेचा जणू जिवंत इतिहास त्यांच्या उपस्थितीत साकार झाला.
मधुभाईंनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांनी हिंदुत्वाचा नव्हे, तर राष्ट्रीयत्वाचा पुरस्कार केला असल्याचे स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी धार्मिक वादात न अडकता राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासावा, असे आवाहन त्यांनी केले. कोमसापचे कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ यांच्या विशेष प्रयत्नांतून ही भेट साकार झाली. मधुभाईंनी एस. एम. जोशी यांच्या महाराष्ट्रातील एकमेव पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत अनेक आठवणींना उजाळा दिला. नवनिर्माणचा धागा पकडत त्यांनी मागील शतकातील रत्नागिरीच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला.
या वेळी नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये म्हणाले, मधुभाईंचे नवनिर्माणच्या प्रांगणात आगमन अत्यंत प्रेरणादायी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाची भूमिका बजावणाऱ्या एस. एम. जोशी यांच्या आदर्शांवर उभी असलेली नवनिर्माण संस्था त्यांचा वैचारिक वारसा जपत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.