कोकण

संगमेश्वर-प्रदीपकुमार देडगेंच्या चित्राची कला प्रदर्शनासाठी निवड

CD

- rat२५p११.jpg-
२६O१९९७५
प्रदीपकुमार देडगे
- rat२५p१२.jpg-
P२६O१९९७६
प्रदीपकुमार देडगे यांनी काढलेले चित्र.
----------

देडगे यांच्या चित्राची
कला प्रदर्शनासाठी निवड
​सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः कलेच्या क्षेत्रातील अत्यंत मानाचे आणि प्रतिष्ठेचे समजले जाणारे ३८ वे अखिल भारतीय लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर व्ही. व्ही. ओक स्मृती कला प्रदर्शन पुण्यात भरणार आहे. या प्रदर्शनासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्टचे प्रा. प्रदीपकुमार देडगे यांच्या चित्राची निवड झाली आहे.
पुण्यातील टिळक रोड येथील टिळक स्मारक मंदिर येथे फेब्रुवारी महिन्यात हे प्रदर्शन होईल. या प्रदर्शनात भारतभरातील नामांकित आणि उदयोन्मुख कलाकारांची चित्रे, शिल्पे आणि ‘लाईव्ह स्केचेस’ प्रदर्शित केली जातात. ३८ व्या आवृत्तीसाठी निवड प्रक्रियेतून अत्यंत मोजक्या कलाकृतींची निवड करण्यात आली असून, त्यात प्रा. देडगे यांनी स्थान मिळवले आहे. या प्रदर्शनासाठी देशभरातून हजारो प्रवेशिका येतात. ३८ व्या आवृत्तीसाठी निवड झालेल्या कलाकारांना १९ जानेवारीपर्यंत आपली मूळ चित्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली होती.​प्रदर्शनादरम्यान केवळ चित्र प्रदर्शनच नव्हे, तर लँडस्केप पेंटिंगची थेट प्रात्यक्षिके आणि विशेष कार्यशाळाही होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता दोन मिनिटांत दाखल होईल FIR, नागपूर पोलिसांनी AI च्या मदतीने विकसीत केली नवी प्रणाली..

Mumbai News: पुन्हा मराठा आरक्षणाचा घाट कशासाठी? विरोधकांचा न्यायालयात युक्तिवाद

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT