-rat२५p१८.jpg-
P२६O२००११
संगमेश्वर ः देवधामापूर शाळेतील परसबागेत विद्यार्थ्यांच्या सहभागातून पिकवलेली सेंद्रिय हळद.
-rat२५p१९.jpg-
२६O२००१२
सेंद्रिय हळद
----------
‘देवधामापूर’च्या परसबागेत पिकली सेंद्रिय हळद
शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; पुस्तकी ज्ञानाला कृतीची जोड
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि काळाची गरज ओळखून, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा देवधामापूर सप्रेवाडी येथे ‘पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजने’अंतर्गत परसबाग प्रकल्पात ‘हळद लागवड ते कापणी’ या आगळ्यावेगळ्या प्रात्यक्षिक उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेतील या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना केवळ माहिती न देता, त्यांच्याकडून प्रत्यक्ष जमिनीची मशागत, गादीवाफे तयार करणे, बियाणे लागवड आणि सेंद्रिय खतांचा वापर करून घेण्यात आला. हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात मुले प्रत्यक्ष सहभागी झाल्यामुळे त्यांना शेतीतील तांत्रिक बाबींचा अनुभव मिळाला. या शाळेने ‘सेलम’ या सुधारित वाणाची निवड केली असून, संपूर्ण लागवड पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली आहे. या प्रक्रियेत हळदीचे सांस्कृतिक महत्त्व, तिचे औषधी उपयोग आणि हळदीतील ‘कुरकुमीन’ या मुख्य घटकाचे महत्त्व यावर शिक्षकांनी प्रकाश टाकला. विशेष म्हणजे, या काढणीनंतर नैसर्गिक प्रक्रिया करून तयार केलेली शुद्ध हळद पावडर शाळेतील ‘शालेय पोषण आहारात’ वापरली जाते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषमुक्त आणि सकस आहार मिळण्यास मदत होत आहे.
हा संपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक अरुण जाधव, सहशिक्षक सतीश वाकसे, शालेय पोषण व्यवस्थापिका सौ. वेदिका माईन, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश सप्रे आणि उपाध्यक्षा सुहासिनी भातडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नेटकेपणाने पार पडला.
--------
चौकट
निसर्गप्रेम रुजविण्यास मदत
पुस्तकात छापलेले शब्द प्रत्यक्ष जगण्यात उतरवणे, या उद्देशाने राबवण्यात येत असलेला हा प्रकल्प शाळेची एक वेगळी ओळख बनला आहे. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा आणि निसर्गप्रेम रुजविण्यास या उपक्रमामुळे मोठी मदत होत आहे, असे ग्रामस्थांनी आवर्जून सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.