कोकण

धर्म, जात, वंश न पाहता निर्भयपणे मतदान करा

CD

rat२५p१६.jpg-
२६O२०००९
रत्नागिरी ः राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पटवर्धन हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांचा सत्कार करताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल. सोबत अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी.
---
मतदानाचा अधिकार हेच लोकशाहीचे बलस्थान
न्यायाधीश व्ही. वाय. जाधव ः निर्भयपणे मतदान करण्याचे आवाहन, राष्ट्रीय मतदार दिनी कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ ः भारताच्या संविधानाने धर्म, जात, वंश असा कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला सर्वसमावेशक मतदानाचा अधिकार दिला आहे. तरुण पिढी हे देशाचे भवितव्य असून, आपले कर्तव्य समजून प्रत्येकाने निर्भयपणे मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, उपजिल्हा निवडणूक कार्यालय, उपविभागीय कार्यालय व तहसीलदार कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश व्ही. वाय. जाधव व जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी मतदारांना संदेश देऊन स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी हवेत फुगे सोडून लोकशाहीचा उत्साह साजरा करण्यात आला.
याप्रसंगी न्यायाधीश जाधव म्हणाले, ९२० पर्यंत जगातील अनेक देशांत महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता. मात्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाद्वारे सर्वांना समान अधिकार मिळवून दिला. आपल्या परिसराचा आणि राज्याचा विकास करू शकेल असा लोकप्रतिनिधी निवडण्याची ताकद तुमच्या हातात आहे. त्यामुळे स्वतः मतदान करा आणि इतरांनाही प्रोत्साहित करा. या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय मतदार दिवसा’ची प्रतिज्ञा घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी, शाळा तसेच रांगोळी व निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

चौकट
मतदान १०० टक्के होण्यासाठी प्रयत्न करा
भारत १९४७ ला स्वतंत्र झाला असला, तरी २६ जानेवारी १९५० ला संविधान अंमलात आल्यावर आपण खऱ्या अर्थाने लोकतंत्र झालो. लोकशाहीत मतदानाचा अधिकार ही अभिमानाची गोष्ट आहे. आपला आवाज शासनापर्यंत पोहोचवण्याचे मतदान हे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे मतदानाची टक्केवारी १०० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन मनुज जिंदल यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : स्कूलबसने चिरडल्यानं एक वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू, आजी गंभीर जखमी; नातीला आणायला गेल्यावर अपघात, घटना CCTVमध्ये कैद

Mumbai News: राज्यातील आयटीआय कात टाकणार! राज्य मंत्रिमंडळ बैठक, ‘पीएम सेतू योजने’अंतर्गत आधुनिकीकरण होणार..

Maharashtra Weather Alert : राज्यात ढगाळ वातावरण कायम, 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशारा, तुमच्या भागांत कसे असेल हवामान? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : अमृता फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये; अंजली भारती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Student Development : विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासासाठी शाळेतील आपुलकीचे वातावरण आवश्यक

SCROLL FOR NEXT