20073
कुडाळ ः खुल्या गटातील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ मुंबईचा श्रीकांत खेडकर.
20072
कुडाळ ः महिला गटातील विजेते योगेश्वरी कदम, श्रावणी घोडेश्वर, सृष्टी कुंभोजे.
‘इन्स्पायर’ला आंतरराष्ट्रीय दर्जा हवा
जिल्हाधिकारी ः कुडाळातील स्पर्धेत श्रीकांत खडतरे ‘महाविजेता’
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २५ ः इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी. ही स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी काढले. या स्पर्धेत ६० कि.मी. कोस्टल रेसमध्ये श्रीकांत खडतरे महाविजेता, योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम, सिद्धेश पाटील पुरुषांमध्ये प्रथम तर वयोगट ४० वरच्या गटात नवीन नाईक प्रथम आला.
सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशन, रेन्बो रायडर्स सिंधुदुर्ग आयोजित ‘इन्स्पायर सायकल ८ वे पर्व’ स्पर्धा आज येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था (एमआयडीसी) येथे पार पडली. जिल्हाधिकारी धोडमिसे यांचे हस्ते उद्घाटन झाले. स्पर्धेत ४० कि.मी. कोस्टल रेसमध्ये ठाणे मुंबईचा श्रीकांत खडतरे महाविजेता ठरला. सांगलीची योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम, कोल्हापूरचा सिध्देश पाटील पुरुषांमध्ये प्रथम, वयोगट ४० वरच्या गटात गोव्याचा नवीन नाईक प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूमध्ये मालवण कट्टा येथील श्राव्य झांटये विजेता ठरला.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे, उपविभागीय परिवहन अधिकारी सूरजकुमार जाधव व माणिक चोरमोळे, तहसीलदार सचिन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, उमेश गाळवणकर, लक्ष्मी ज्वेलर्सचे राजू पाटणकर, रोटरीचे अध्यक्ष राजीव पवार, लायन्स क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष आनंद कर्पे, रॉयल मालवणीचे डॉ. अभय परब, राणे हॉस्पिटल व रिसर्च सेंटर कुडाळचे डॉ. जी. टी. राणे व अजित राणे, डॉ. अमोघ चुबे, सिंधुदुर्ग सायकलिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गजानन कांदळगावकर, शेखर सामंत, सचिव अमोल शिंदे, इव्हेंट चेअरमन प्रथमेश सावंत, रेन्बो रायडर्सचे डॉ. बापू परब, डॉ. सिध्दार्थ परब, शिवप्रसाद राणे, रुपेश तेली, असिस्टंट गव्हर्नर सचिन मदने आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पर्धेत सहभाग घेत २५ कि.मी. फन राईड यशस्वी पूर्ण केली. त्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. नितीन खामामकर, डॉ प्रणव प्रभू, कुडाळ इनरव्हील क्लब अध्यक्षा सानिका मदने, खजिनदार गितांजली कांदळगावकर, रश्मी नाईक, ॲड. विवेक मांडकुलकर, वेदिका मांडकुलकर, मीडिया पार्टनर महेश दाभोलकर (मुंबई), रत्नागिरी प्रमुख आयोजक विक्रांत आलेकर, शिवप्रसाद राणे, सखे सोबती ग्रुप पिंगुळी, मुंबईची १२ वर्षीय सायकलपटू सान्वी पाटील, प्रमोद भोगटे, अजित कानशिडे, अभिजित परब, मुंबईच्या ज्येष्ठ महिला सायकलपटू रोहिणी तिलक व मंगला पै आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. स्पर्धेतील महाविजेता श्रीकांत खडतरे याला २५ हजार, प्रमाणपत्र व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. गजानन कांदळगावकर यांनी प्रास्ताविक केले. सचिन मदने यांनी सूत्रसंचालन केले. अमोल शिंदे यांनी आभार मानले.
.................
गटनिहाय विजेते असे
सिंधुदुर्ग-श्राव्य झांटये (मालवण), सिल्वेस्टर डिसोझा (सावंतवाडी), डॉ. अब्दार पाटील (कणकवली). ४० वयोगट पुरुष-नवीन नाईक (गोवा), किरण पवार (मुंबई), रोहन कोळी (मुंबई). महिला गट-योगेश्वरी कदम (सांगली), श्रावणी घोडेश्वर (कोल्हापूर), सृष्टी कुंभोजे (कोल्हापूर), १४ ते ४० वयोगट-सिध्देश पाटील (कोल्हापूर), हनुमंत चोपडे (सांगली), ओंकार खेडकर( पुणे).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.