प्रजास्त्ताक दिन
(दोन कॉलमध्ये पट्टा लावणे)
‘जीजीपीएस’मध्ये सामूहिक कवायत, संचलन
रत्नागिरी : जीजीपीएसमध्ये प्रजासत्ताक दिन ध्वजवंदन, राष्ट्रगीत, प्रार्थना, प्रतिज्ञा, राज्यगीत आणि ध्वजगीताने साजरा झाला. प्रसंगी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केले. विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सामूहिक कवायत प्रकार सादर केले. मुख्याध्यापिका सोनाली पाटणकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अपूर्वा मूरकर, गुरूकुलप्रमुख वासुदेव परांजपे, पूर्व प्राथमिक विभागप्रमुख शुभदा पटवर्धन प्रमुख उपस्थित होते. इयत्ता पहिलीतील रियांश जोशी आणि श्रीहरी तांबे यांनी भाषणे सादर केली. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रिक्षा व व्हॅनचालक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांभेकर विद्यालयात विविध कार्यक्रम
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करून प्रजासत्ताक दिनी विविध उपक्रम साजरे करण्यात आले. या प्रसंगी मालतीबाई जोशी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विलास पांचाळ उपस्थित होते. या वेळी एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. दुर्वांग शेलार, लावण्य इंदुलकर, निधी शिवगण, रोशनी देवरूखकर, उत्तरा कदम, विघ्नेश कांदर, आस्था तुळसणकर, आर्यन चव्हाण, सूरज खेत्री, वेदिका सनगरे आणि मार्गदर्शक कलाशिक्षक अनिल सागवेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मोर (जि. गोंदिया) येथील कलाशिक्षक रूपराम धकाते यांच्या देणगीतून अ श्रेणी मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १०१ रुपये देण्यात आले. श्री सत्य साई सेवा समितीच्या अभंग गायन स्पर्धेत यश मिळवलेल्या नमिता सागवेकर व हर्ष पांचाळ यांचाही गौरव झाला. सक्षम मोसमकर याने मनोगत व्यक्त केले.
माहेर वृद्धाश्रमात प्रजासत्ताक दिन
रत्नागिरी : खेडशी येथील माहेर वृद्धाश्रम येथे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते आणि रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य विशाल भोसले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. सर्व ज्येष्ठांनी एकाच रंगाचे पोशाख परिधान केल्यामुळे सर्वांचेच लक्ष वेधत होते. माहेर संस्थेचे प्रकल्प प्रमुख सुनील कांबळे यांनी आभार मानले. या प्रसंगी वृषभ खडसे, राकेश भिल, अमित येलवे, फुलाबाई पवार, अर्चना भिल, आशिष मुळे बाबा उपस्थित होते.
तुरळ-कडवई-चिखलीत प्रभातफेरी
साडवली ः संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे प्रजासत्ताक दिनी रिक्षा संघटनेतर्फे तुरळ-कडवई-चिखली अशी प्रभातफेरी काढण्यात आली. फेरीत ८५ रिक्षा सामील झाल्या होत्या. फेरीत ध्वनीक्षेपकांवर देशभक्तीपर गीते लावण्यात आली होती. रिक्षा संघटनेच्यावतीने कडवई-तुरळ-चिखली येथील शाळांमध्ये चॉकलेट वाटप करण्यात आले. कडवई बाजारपेठेत सरपंच विशाखा कुवळेकर यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजवंदन करण्यात आले. या वेळी भाईशा घोसाळकर हायस्कूल, महाराष्ट्र उर्दू हायस्कूल आणि दी इंग्लिश स्कूल कडवईच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतगायन केले. या वेळी रिक्षा संघटनेच्यावतीने माजी सैनिक अंकुश साळुंके व परशुराम कदम यांचा सत्कार करण्यात आला.
गोवळकोट येथे वाशिष्ठी पूजन
चिपळूण ः प्रजासत्ताक दिनानिमित्त चिपळूणमध्ये गोवळकोट-भोईवाडी येथील भोई समाजाच्या महिलामंडळातर्फे हळदीकुंकू समारंभानिमित्त वाशिष्टी नदीची पूजा करून ओटी भरण्यात आली. भोई समाजाचा उदरनिर्वाह वाशिष्टी नदीवर अवलंबून असल्याने या ऋणातून उतराई होण्यासाठी महिला मंडळातर्फे सलग तिसऱ्या वर्षी हा कार्यक्रम घेण्यात आला. गोवळकोट भोईवाडीचे अध्यक्ष मधुकर कासेकर, सचिव राजेश सैतवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात येतो. महिला मंडळाच्या अध्यक्षा सरस्वती कासेकर, उपाध्यक्ष मंजुळा कासेकर, गोवळकोट सातगाव ग्रामीण महिला सचिव संजीवनी जुवळे, प्रिया कासेकर, दीपाली जुवळे, आर्या जुवळे, अंजली सैतवडेकर अशा अनेक महिला उपस्थित होत्या.
असुर्डे विद्यालयात प्रजासत्ताक दिन
सावर्डे ः सह्याद्री शिक्षणसंस्थेचे वसंत शंकर देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय असुर्डे आंबतखोल या विद्यालयात भारताचा ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अमर भाट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथ राऊत, विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक दत्ताराम फुटक, असुर्डे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नीलेश खापरे, विद्यालयाचे माजी विद्यार्थी व व्यावसायिक शेखर जाधव, स्वप्नील जाधव, अमोल जाधव, ज्योती खूनम, शिक्षणप्रेमी मनोहर पाष्टे यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.
रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रात प्रजासत्ताक दिन
रत्नागिरी, ता. २७ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी संचालक दिनकर मराठे म्हणाले, जगाच्या पाठीवर भारत एकमात्र असा देश आहे ज्या देशात भाषा, संस्कृतीसारख्या बाबतीत विविधता आहे. त्यामुळे भारत देश हा नावीन्यपूर्ण आहे. संस्कृत आणि संस्कृती यांचा मिलाफ असणाऱ्या भारतीय ज्ञानपरंपरेतून विकसित भारत साकारूया. भारतात विविध संस्कृतींची एक विशेषता आहे. अशीच सर्व संस्कृतींचे मिश्रण असणारी संस्कृतनिष्ठ भारतीय ज्ञानपरंपरा भारताला विकसित करण्यात महत्त्वाचे योगदान देणारी आहे. त्यामुळे विकसित भारतासाठी आपण सर्वांनी संघटित प्रयत्न करू.