- rat२७p१०.jpg-
P२६O२०१५६
डॉ. पुष्कराज चांदोरकर
फिजिओ संवाद ..........लोगो
(२१ जानेवारी टुडे ८)
सोप्या व्यायामांनी जातात दुखणी
पेनकिलरची सवय का लावता?
पेनकिलर घेतल्यावर मिळणाऱ्या पटकन आरामाची शरीराला सवय होत जाते. गोळीचा प्रभाव कमी झाल्यावर परत दुखणे वाढू लागते. मग परत पेनकिलर घ्यावीशी वाटते आणि हे चक्र चालूच राहते. पेनकिलर तुमचे दुखणे घालवत नाही तर त्याची जाणीव कमी करते. त्यामुळे पेनकिलरची मर्यादा ओळखून आणि वेदनेचे मूळ शोधून त्यावर उपाय करणे हा दुखणे कमी करण्याचा आदर्श मार्ग आहे. पेनकिलरच्या दूरगामी वाईट परिणामांबद्दल तर आपण सर्वच जाणतो.
- डॉ. पुष्कराज चांदोरकर
(PT) B.P.Th.
cpushkaraj०७@gmail. com
---------
पेशंटकडून सर्रास ऐकू येणार वाक्य म्हणजे ‘दुखणं येऊन खूप महिने झालेत, सगळे उपाय करून झाले, आता गोळ्या खाऊन कंटाळा आलाय मग फिजिओथेरपी करून बघूया.’ या वाक्यामध्ये खूप गोष्टी लपलेल्या आहेत. दुखणे आल्यानंतर सर्वात पहिला केला जाणारा उपाय म्हणजे पेनकिलर गोळी. अगदी सर्रास वापरली जाणारी ही गोळी घेताना अनेकदा पेशंट विचार करत नाहीत की, ही गोळी नक्की काय आणि कशी काम करते. सुरुवातीला ही गोळी कमी मात्रेमध्ये दिली जाते त्यानंतर त्या मात्रेचा उपाय न झाल्यास मात्रा वाढवली जाते किंवा औषध बदलले जाते. हळूहळू त्या गोळीची शरीराला सवय होऊ लागते आणि शरीर त्या गोळीला प्रतिसाद देणे बंद करते. दुखणे काही जात नाही; पण वेळ मात्र हातातून निघून जाते.
जेव्हा एखादी गोळी परत परत शरीरात घेतली जाते तेव्हा आपले शरीर हळूहळू त्या गोळीशी जुळवून घ्यायला सुरुवात करते. आधी जी गोळी दुखणं कमी करत होती तीच गोळी नंतर प्रभावी ठरणे बंद होते. त्यानंतर त्याच गोळीचा ‘हाय डोस’ घेणे गरजेचे होते किंवा मग तीच गोळी दिवसातून दोनऐवजी तीनदा घ्यावी लागते. मग त्याही गोष्टीची शरीराला सवय होते. ‘ओपीऑइड’ प्रकारच्या गोळ्या हळूहळू कमी प्रभावी होत जातात. इतर प्रकारच्या पेनकिलर गोळ्यांबद्दल देखील तेच होते.
पेनकिलर रोज घेतल्याने शरीर त्याच्यावर अवलंबून व्हायला लागते. गोळी घेतली तरच दुखणे जाईल अशी भावना शरीरामध्ये येऊ लागते. गोळी न घेता दुखणे जाऊ शकते, या गोष्टीवरचा विश्वास उडतो आणि मग गोळीवर अवलंबून राहण्याची प्रवृत्ती वाढू लागते. गोळी बंद केल्यास त्याची विपरीत लक्षणे दिसू लागतात. बेचैनी वाढते, झोप बिघडते, स्ट्रेस वाढतो पर्यायाने दुखणे वाढते. हे सर्व टाळण्यासाठी माणूस अधिक पेनकिलरवर अवलंबून होत जातो. एखाद्या गोळीवर अवलंबून होणे आणि एखाद्या गोळीचे व्यसन लागणे या दोन्ही गोष्टी यामध्ये घडू शकतात.
दुखणे जर कमकुवत स्नायूमुळे असेल तर त्या स्नायूंची ताकद वाढवणे, जर शरीराच्या चुकीच्या ठेवणीमुळे असेल (posture) तर ते सुधारणे, सांध्यांमध्ये आखडलेपणा असेल तर तो घालवणे, मज्जासंस्थेचा भार कमी करणे, स्ट्रेस असेल किंवा झोपेचा अभाव असेल तर त्यावर उपाय करणे, शरीरातल्या चुकीच्या गोष्टी शोधून त्या सुधारणे हाच खरा दुखण्यावरचा उपाय आहे. पेनकिलर काही वेळासाठी तुमचे दुखणे घालवू शकेल; पण जर वेदनेचे मूळ ठीक केले नाही तर वेदना जाणार नाही, हे समजून घेणे गरजेचे आहे.
दिवसभर काम केल्यानंतर येणारा आखडलेपणा, कंबरदुखी, मानदुखी, पाठदुखी, वयोमानानुसार येणारी सांधेदुखी किंवा जीवनशैलीमुळे येणाऱ्या दुखण्यावर पेनकिलर हाच उपाय न मानता सोप्या सोप्या व्यायामांनी ते दुखणे जाऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यासाठी फिजिओथेरपी लवकरात लवकर सुरू करणे खूप फायदेशीर ठरेल.
(लेखक लांजा येथे अनादि फिजिओथेरपी क्लिनिक चालवतात.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.