कोकण

‘साय एक्सपो’ त शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग

CD

विज्ञान-तंत्रज्ञानाची ओढ वाढवणारा उपक्रम
‘साय एक्सपो’त विद्यार्थ्यांचा सहभाग ; माने अभियांत्रिकी महाविद्यालयतर्फे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ ः माध्यमिक शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित विविध स्पर्धांची ओळख व्हावी आणि त्यांना तांत्रिक अभ्यासक्रमाची ओढ लागावी, या उद्देशाने आंबव येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘साय एक्सपो २०२६’ या उपक्रमात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचे दर्शन घडवत एकापेक्षा एक सरस प्रकल्प सादर केले.
महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील ‘असोसिएशन ऑफ कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ (एस) या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात परिसरातील न्यू इंग्लिश स्कूल देवरूख, पी. एस. बने इंटरनॅशनल स्कूल, माध्यमिक आश्रम शाळा निवे बुद्रुक, मीनाताई ठाकरे हायस्कूल, कोसुंब हायस्कूल आणि दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाचे उद्‍घाटन प्राचार्य डॉ. महेश भागवत यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, विभागप्रमुख प्रा. शुभांगी कांबळे, प्रा. प्रियांका वनकर, शिक्षक प्रतिनिधी राज जाधव, अगस्ती कुमटेकर तसेच पालक प्रतिनिधी चंदन चव्हाण आदी उपस्थित होते. विज्ञान प्रकल्प प्रदर्शन, चित्रकला, प्रश्नमंजूषा आणि नकाशा भरणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा समारोप व पारितोषिक वितरण समारंभ प्रबोधन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार रवींद्र माने यांच्या हस्ते पार पडला. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी समन्वयक प्रा. प्रियांका वनकर, विद्यार्थी समिती प्रमुख सिद्धेश गुरव यांच्यासह सर्व विभागीय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------
चौकट
विविध स्पर्धांचा निकाल
या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी असे (प्रथम, द्वितीय, तृतीय याप्रमाणे) : नकाशा भरणे स्पर्धेत यशश्री गमरे (पी. एस. बने स्कूल), कार्तिकी विंचू (पी. एस. बने स्कूल), प्रेम राठोड (आश्रम शाळा निवे बुद्रुक) यांनी यश मिळवले. चित्रकला स्पर्धेत ललित पातेरे (मीनाताई ठाकरे हायस्कूल), मृणाल कांबळे (निवे हायस्कूल), मंथन लिंबुळकर (कोसुंब हायस्कूल) यांनी बाजी मारली. हर्ष डिके (उत्तेजनार्थ). विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात रुद्र चव्हाण व मीर मुळ्ये (बुरंबी हायस्कूल), सायली माने व दिया लाड (निवे हायस्कूल) तर यशश्री गमरे व कार्तिकी विंचू (पी. एस. बने स्कूल) विजेते ठरले. प्रश्नमंजूषा स्पर्धेत मृणाल मोहिरे व आर्या लोहिया, गणेश लोटणकर व आरूष चव्हाण, संस्कार करांडे व सर्वेश रेडीज यांनी यश मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT