कोकण

देवगड महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना करिअरचे धडे

CD

swt271.jpg
20200
देवगड ः येथील महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

देवगड महाविद्यालयामध्ये
विद्यार्थ्यांना करिअरचे धडे
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २५ः येथील स. ह. केळकर महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये चलन बाजाराची संकल्पना, परकीय चलन व्यवहार, विनिमय दर व त्यावर परिणाम करणारे घटक, चलन बाजारातील जोखीम व संधी, तांत्रिक व मूलभूत विश्‍लेषण, तसेच करिअरच्या संधी अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर नीलेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
श्री. चव्हाण यांनी, उदाहरणासह विद्यार्थ्यांना चलन बाजाराची कार्यपद्धती समजावून सांगत व्यवहारातील सावधगिरी व कौशल्य विकासावर भर दिला. कार्यशाळेच्या प्रारंभी प्राचार्य विजयकुमार कुनुरे व उपप्राचार्य श्रीकांत शिरसाठे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी प्राचार्य कुनुरे यांनी, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित होतो, असे सांगितले. प्रा. शिरसाठे यांनी, आर्थिक साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यशाळेसाठी प्रा. सुरवसे, संकेत वारंग, मंगेश चव्हाण, सौरभ मंत्री, मुकेश गायकवाड, सिद्धेश गावडे उपस्थित होते. सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुहास खरात यांनी केले. प्रा. अच्युत कांबळी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant: सर्वोच्च न्यायालयाने संपूर्ण देश चालवावा का? सरन्यायाधीशांना कशामुळे राग आला, म्हणाले, "ही याचिका शॉपिंग मॉलसारखी"

Chhatrapati Sambhajinagar Gas Shortage: गॅस टंचाईची भीती; संभाजीनगरमध्ये सिलिंडरसाठी १० दिवसांची वेटिंग; डबल सिलिंडर असलेले ग्राहकही आगाऊ बुकिंगकडे

Pi Day 2026: 'या' कारणामुळे 14 मार्चला साजरा केला जातो 'पाय डे'! जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि काही रंजक गोष्टी

Chhatrapati Sambhajinagar News: गॅससाठी जनतेच्या रांगा, पण पथकांना काळाबाजार दिसतच नाही! छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस गोंधळ

नवीन लॉ कॉलेजच्या मान्यतेसाठी १४ नवे नियम! बार कौन्सिल ऑफ इंडियाचे गॅझेट प्रसिद्ध; इतक्या किलोमीटर अंतराची अट अन्‌ गरज पाहूनच मान्यता, वाचा...

SCROLL FOR NEXT