swt2721.jpg
20321
धाकोरे ः ग्रामस्थ व शिक्षकांनी श्रमदानामधून संरक्षक भिंत उभारली.
शाळेची संरक्षक भिंत ठरली ऐक्याचे प्रतीक
धाकोरेवासीयांचा आदर्श; ग्रामस्थ, शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचे योगदान
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २७ ः जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे क्र. १ ही भौगोलिक दृष्ट्या तशी दुर्गम भागातील शाळा, पण ग्रामस्थ आणि शिक्षकांनी निश्चय केला तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे दाखवून दिले आहे. धाकोरे ग्रामस्थ व शिक्षकांनी शाळेसाठी सुमारे ५० मीटर लांबीची संरक्षक भिंत उभारून समाजापुढे चांगला आदर्श घालून दिला.
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धाकोरे क्र. १ चा माजी विद्यार्थी संघ, ग्रामस्थ पालक, व्यवस्थापन समिती या सर्वांनी एकत्र येऊन सुमारे ५० मीटर लांबीची संरक्षक भिंत विना मोबदला शाळेसाठी उभारून दिली व शाळेच्या विद्यार्थ्यांच्या संरक्षणाचा प्रश्न सोडवीत इतरांसाठी आदर्श घालून दिला. शाळेचा माजी विद्यार्थी संघ ग्रुप कार्यरत असून या ग्रुपवर दीपक मुळीक यांनी शाळेला आर्थिक, वस्तुरूप मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनुसरून शाळेच्या प्राथमिक गरजा, भौतिक सुविधा याबाबत चर्चा घडू लागली आणि दात्यांनी आर्थिक तसेच वस्तुरूप देणगी देण्यास सुरुवात केली. यामध्ये काहींनी दगड (चिरे), सिमेंट, वाळू मोफत दिले, तर काहींनी श्रमदान करून प्रजासत्ताक दिनापूर्वीच सुमारे ५० मीटर लांब संरक्षक भिंत बांधून मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला. या कामासाठी धाकोरे गावच्या सरपंच स्नेहा मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा यशश्री पवार, उपाध्यक्ष रवींद्र मुळीक, सर्व पालक वर्ग तसेच शाळेच्या आवारात दगड आणून देणारे सर्व माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, गावचे पोलिसपाटील श्रीराम प्रभूराळकर, महादेव मुळीक, शामसुंदर गोवेकर, नितीन मुळीक, नीलेश मुळीक यांनी विशेष परिश्रम घेऊन संरक्षक भिंतीची उभारणी करण्यास मदत केली. यावेळी शाळेतील सर्व माता-भगिनींनी शालेय परिसर स्वच्छ करण्यास हातभार लावला.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आजगावकर, शाळेचे उपक्रमशील शिक्षक दिगंबर तळणकर, प्रेरणा गोवेकर, सोनल जाधव यांनीही या कामात सहभाग दर्शविला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.