कोकण

शास्त्री नदीत मगरीचा मुक्त संचार; परिसरात भीतीचे वातावरण

CD

- rat२७p६.jpg-
P२६O२०१५२
संगमेश्वर ः शास्त्री नदीपात्रात किनाऱ्यावर आलेली मगर.
-----
शास्त्री नदीपात्रात मगरीचा मुक्त संचार
संगमेश्वर परिसरात भीतीचे वातावरण; सतर्कतेच्या सूचना, वनविभागाच्या कारवाईकडे लक्ष
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २७ : संगमेश्वर शहरातून वाहणाऱ्या शास्त्री नदीपात्रात महामार्गालगत मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. अचानक निर्माण झालेल्या उष्म्यामुळे आणि नदीची पाणीपातळी कमी झाल्याने ही मगर काठावर येऊ लागल्याचा अंदाज बांधला जात आहे. याकडे वनविभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
शास्त्री नदीचे पात्र अनेक ठिकाणी अरुंद झाले आहे. पावसाळ्यातील पुराच्या पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे ही मगर नदीपात्रात वाहून आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. संगमेश्वर येथील रहिवासी जमीरूद्दीन मुजावर हे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करत असताना त्यांना महामार्गालगतच्या नदीपात्रात एक मोठी मगर पाण्याबाहेर येऊन निर्धास्तपणे वावरताना दिसली. त्यांनी तत्काळ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात या मगरीचे छायाचित्र टिपले आहे. ही मगर केवळ पाण्यातच नव्हे तर काठावरील खडकांवर आणि रेतीत येऊन बसत आहे. शास्त्री नदीच्या काठावर अनेक गावांची वस्ती असून, शेतकरी, कष्टकरी आणि महिलांचा दैनंदिन कामासाठी नदीशी सतत संपर्क येतो. अशा परिस्थितीत मगरीचे हे अस्तित्व धोकादायक ठरू शकते. मगरीचा वावर मानवी वस्तीजवळ होत असल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-----
चौकट
तातडीने बंदोबस्त करा
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी करून मगरीच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि गरज भासल्यास तिला सुरक्षितरीत्या पकडून मानवी वस्तीपासून लांब हलवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. जोपर्यंत ही मगर पकडली जात नाही तोपर्यंत नागरिकांनी नदीकाठी जाताना सावधगिरी बाळगावी आणि अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT