कोकण

निधी जोशींचे आज शिरोडा येथे गायन

CD

निधी जोशींचे आज
शिरोडा येथे गायन
सावंतवाडीः शिरोडा येथील र. ग. खटखटे ग्रंथालयात नोव्हेंबरपासून द्वैमासिक संगीत सभा सुरू करण्यात आल्या आहेत. होतकरू व नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, हा या सभेचा मुख्य हेतू आहे. या संगीत सभेचे दुसरे पुष्प शिरोडा येथील गायिका निधी जोशी हिच्या गायनाने गुंफले जाईल. निधी ही संगीत विशारद असून अनेक गायन स्पर्धांमध्ये तिने पारितोषिके पटकावली आहेत. हा कार्यक्रम उद्या (ता. २८) सायंकाळी ६ वाजता खटखटे ग्रंथालयात होणार असून संगीतप्रेमी रसिकांनी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी डॉ. श्रीराम दीक्षित, विनय सौदागर यांचेशी संपर्क साधावा.
.......................
घारपी मठात उद्या
पादुका दर्शन सोहळा
बांदा ः घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठात अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता. २९) करण्यात आले आहे. हा पालखी सोहळा दुपारी १२ ते ३ या वेळेत होणार असून, सर्व स्वामी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पादुका दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती विजय गावकर, समस्त घारपी ग्रामस्थ आणि स्वामी सेवक भक्त मंडळी यांनी केले आहे. यावेळी भजन, नामस्मरण तसेच महाप्रसादाचाही लाभ भक्तांना मिळणार आहे. रात्री ८.३० वाजता माऊली दशावतार नाट्यमंडळ, डोंगरपाल यांचा दशावतार नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
........................
तळाशील येथे
धार्मिक कार्यक्रम
आचरा ः तळाशील येथील श्री गोपाळकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेचा ४८ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवारपासून (ता. २९) सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (ता. २९) पहाटे ४ वाजता अभिषेक, सकाळी ९ वाजता महापूजा, हळदीकुंकू, आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ५ वाजता महेश धामापूरकर (मालवण) यांचे कीर्तन, ७ वाजता भजने, रात्री १० वाजता सत्कार सोहळा, ११ वाजता मालवणी नाटक ''वाट चुकलो देवा'' (लेखक-किशोर तळवळकर, दिग्दर्शक-नंदकुमार तळवडकर), शुक्रवारी (ता. ३०) सकाळी सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, रात्री १० वाजता गुणगौरव, १०.३० वाजता सामाजिक नाटक ''छुमंतर'', शनिवारी (ता. ३१) दुपारी महाप्रसाद, ३ वाजता फनी गेम्स, रात्री १० वाजता विनोदी नाटक ''दिसतं तसं नसतं'', रविवारी (ता. १) अक्षय सातार्डेकर प्रस्तुत आर्केस्ट्रा ''स्वर अक्षय'' (गुड बॉईज ग्रुप तळाशील), सोमवारी (ता. २) रात्री १० वाजता विनोदी नाटक ''काका किशाचा'' सादर होणार आहे.
...................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT