- rat२७p१८.jpg-
P२६O२०१९५
रत्नागिरी ः आरे येथील स्मशानभूमीकडे जाण्यासाठी श्रमदानातून करण्यात आलेला रस्ता.
-----
ग्रामस्थांच्या एकीतून उभारला ‘अंत्यसंस्काराचा सन्मानमार्ग’
आरे-नागझरीतील उपक्रम ; लोकसहभागातून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः तालुक्यातील आरे-नागझरी येथील ग्रामस्थांनी प्रशासकीय मदतीची वाट न पाहता एकीचे बळ दाखवत एक आदर्शवत काम पूर्ण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाण्यासाठी हक्काचा रस्ता नसल्याने होणारी गैरसोय दूर करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढाकार घेतला आणि लोकसहभागातून निधी उभा करून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
रत्नागिरी-गणपतीपुळे या पर्यटन मार्गावर आरे-नागझरी हे गाव वसलेले आहे. आरे-वारे समुद्रकिनाऱ्यालगत मुख्य रस्त्याच्या अगदी बाजूलाच गावाची स्मशानभूमी आहे; मात्र, मुख्य रस्त्यापासून स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य रस्ता उपलब्ध नव्हता. कच्च्या आणि निसरड्या वाटेमुळे विशेषतः पावसाळ्यात अंत्यविधीसाठी मृतदेह नेताना ग्रामस्थांना प्रचंड हाल सोसावे लागत होते. अनेकवेळा चिखलातून वाट काढताना कसरत करावी लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी गावातील तरुणांनी आणि ज्येष्ठांनी एकत्र येत पुढाकार घेण्याचे ठरवले.
या कामासाठी शासनाच्या निधीची प्रतीक्षा करण्याऐवजी ग्रामस्थांनी स्वतःहून वर्गणी गोळा करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनी दिलेल्या आर्थिक योगदानातून आवश्यक निधी जमा झाला आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली. या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे आता अंत्यसंस्कारासाठी जाताना होणारा त्रास कमी झाला आहे. भविष्यात या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा मानसही ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
-----
चौकट
एकजुटीने निर्णय
ग्रामस्थांनी स्वतःहून राबवलेल्या उपक्रमाबद्दल ग्रामपंचायत सदस्य आशिष कनगुटकर आणि स्थानिक ग्रामस्थ विनोद मयेकर म्हणाले, स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता व्यवस्थित नसल्याने ग्रामस्थांना वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागत होता. ही अडचण दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने निर्णय घेतला आणि आज त्याचे फळ सर्वांना मिळत आहे. ग्रामस्थांचा एक मोठा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. प्रशासनावर विसंबून न राहता स्वतःच्या गावाचा विकास स्वतः करणाऱ्या आरे-नागझरीच्या ग्रामस्थांचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत आहे.
----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.