कोकण

अवजड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका

CD

अवजड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास धोका
बांदा-निमजगा शाळा ः पालकांकडून शाळा बंद आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २८ ः निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या लगत असणाऱ्या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. येथील ग्रामस्थ व पालक यांनी सिंधुदुर्गनगरी येथे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ पासून साखळी उपोषण सुरु केले आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवितास या अवजड वाहतुकीमुळे गंभीर धोका निर्माण झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती, पालक व स्थानिक ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलनाचा लेखी इशारा यापूर्वीच दिला होता. याबाबतचे निवेदन गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पंचायत समिती सावंतवाडी यांना देण्यात आले होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे तसेच शाळेजवळून जड वाहतूक (डंपर, ट्रक, ट्रॅक्टर इ.) सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या संरक्षक भिंतीची कोणतीही व्यवस्था नसून, अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात यापूर्वी ग्रामपंचायत, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षितता धोक्यात आली असून पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. आंदोलनानंतर होणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून पालकांनी मुलांना शाळेत न पाठविता शाळा बंद आंदोलन सुरु केले. दरम्यान, २७ ला पहिल्या दिवशी ४१ पैकी ३७ विद्यार्थी अनुपस्थितीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विमानं ग्राऊंड करण्याचा प्रश्नच नाही! अपघातानंतर विमान कंपनीकडून निवदेन जारी, विमानात तांत्रिक बिघाड नसल्याचंही केलं स्पष्ट

Latest Marathi News Live Update : अजित पवार यांच्या निधनामुळे पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांची दुकाने संपूर्ण दिवस राहणार बंद

Ajit Pawar Death News LIVE Updates : राज ठाकरे बारामतीच्या दिशेने रवाना; अजित पवारांच्या पार्थिवाचं घेणार दर्शन

Banking : 'या' बँकेचा मोठा निर्णय! खातेधारकांच्या खिशाचा भार होणार कमी

Sangli Kadegav ZP : कडेगावमध्ये राजकीय रणसंग्राम! काँग्रेस विरुद्ध भाजप थेट लढतीने तालुक्याचे वातावरण तापले

SCROLL FOR NEXT