swt2810.jpg
20460
बावशी ः गणेश मंदिरात केलेली रोषणाई.
‘पावणादेवी’ मंडळातर्फे
बावशी येथे गणेश जयंती
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २८ ः श्री इच्छापूर्ती गणेश मंदिर बावशी येथे पावणादेवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळाच्या वतीने माघी गणेश जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त बुधवारी (ता. २१) विधीवत पूजा, दुपारी आरती, सायंकाळी लहान मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये बच्चे कंपनीने धम्माल मस्ती केली. रात्री आरतीने संपूर्ण परिसर गणेशमय झाला.
गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुवारी (ता. २२) सकाळी होम हवन, दुपारी महाप्रसाद वाटप, महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी पालखी मंदिर प्रदक्षिणा व दिंडी, सायंकाळी नवस बोलणे व नवस फेडणे, रात्री महाआरती, कोल्हापूर राधानगरी येथील सोंगी भजन, शुक्रवारी (ता. २३) पहाटे काकड आरती, अभिषेक व पूजन, दुपारी महाप्रसाद, रात्री आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या सर्व कार्यक्रमांचा भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहूनदर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. पावणादेवी मंडळाच्या नियोजनाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.