swt२८१२.jpg
२०४६२
तन्वी चांदोस्कर
हर्षा ठाकूरांनी पूर्ण माहिती घेतली नसावी
तन्वी चांदोस्कर ः देवगड पाणी प्रश्नावरून केलेल्या टिकेला प्रत्युत्तर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २८ ः देवगड जामसंडे शहराच्या पाणी योजनेच्या अनुषंगाने समाधानकारक काम न झाल्यानेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची एजन्सी रद्द करुन खासगी संस्थेला नियुक्ती करण्यासाठी सभेत मान्यता देण्यात आली होती. या गोष्टीला वर्ष होऊन सर्व निविदा प्रक्रिया झाली व नवीन एजन्सीला कार्यारंभ आदेश देण्यात आला. ठाकरे शिवसेना गटाचे पाच नगरसेवक त्यावेळी सभागृहात उपस्थित होते; पण त्यांचा विरोध नव्हता याची माहिती ठाकरे गटाच्या हर्षा ठाकूर यांनी घेतली नसावी, असा पलटवार भाजपच्या नगरसेविका तन्वी चांदोस्कर यांनी केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे आवाहनही चांदोस्कर यांनी केले आहे.
येथील देवगड जामसंडे शहराच्या पाणी प्रश्नावरून ठाकरेगट शिवसेनेच्या महिला तालुका संघटक तथा माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांनी विरोधकांना लक्ष्य केले होते. याअनुषंगाने त्यांनी टिका केली होती. त्याला आता भाजप नगरसेविका चांदोस्कर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे, प्रस्तावित कोर्ले सातंडी नळयोजनेची नेमली एजन्सी टक्केवारीसाठी खासगी संस्थेची नेमणूक केल्याचे सौ. ठाकूर यांचे म्हणणे होते. जेव्हा त्या नगरसेविका होत्या तेव्हा योगेश चांदोस्कर उपनगराध्यक्ष असताना त्यांनी खासगी संस्थेचा विचार न करता ऑगस्ट २०१७ मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला एजन्सी म्हणून नेमणूक केली होती; पण समाधानकारक काम न झाल्याने डिसेंबर २०२४ मध्ये एजन्सी रद्द करुन खासगी संस्थेची नियुक्ती करण्याला सभेत मान्यता देण्यात आली.
दहिबाव नळपाणी योजनेसाठी मंजूर कामाच्या ९ कोटी २१ लाख रुपयांचा नगरपंचायतीचा १० टक्के हिस्सा रक्कम सुमारे ९२ लाख व कोर्ले सातंडी नवीन योजनेची १० टक्के रक्कम कुठल्याही परिस्थितीत शहरवासियांवर आर्थिक भुर्दंड ठेवणार नाही. विविध योजनेमध्ये बसवून ती रक्कम उभी करु. पालकमंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया पुर्ण होईल. त्यामुळे त्याची काळजी ठाकूर यांनी करु नये. यापूर्वी जमा केलेली १० टक्के रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे जमा आहे. पूर्वी शिरगांव पाडागर येथील पाणी शहराला चालू होते. अलिकडे जून २०२५ ला वीजबील थकित असल्याने पाडागर योजनेचे जिल्हा परिषदने पाणी बंद केले आहे.
याबाबत जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर पाडागर योजनेचे पाणीसुध्दा शहराला चालू होणार आहे. नगरपंचायतीच्या ९ वर्षांपैकी ३ वर्षे ठाकरेगटाची सत्ता होती. त्यामुळे त्यांच्या जवळ खर्चाचा हिशोब पहिला घ्यावा व त्यानंतर दुसऱ्यांवर आरोप करावा. तसेच चौदा हजाराचा शोधही ठाकूर यांनी प्रथम घ्यावा. देवगड जामसंडे शहरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या समितीचे मार्गदर्शन घेणार आहे. त्यांच्या सुचनांचे पालन केले जाईल. शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यासाठी श्रेय वादात न पडता नवीन कोर्ले सातंडी नळयोजना मंजूर करुन घेऊन कायमस्वरुपी प्रश्न मिटवू. माकडाच्या हातात कोलीत देवून पुन्हा या शहराची राख रांगोळी करु नये यावर आता शहरातील नागरिकांना चांगले माहित आहे की, ठाकरेगटाकडे सत्ता देऊन गेली ४ वर्षे शहराची राख रांगोळी कोणी केली आहे. वेळवाडी भागातील पाण्याची टाकी चालू करुन घेत असल्याचे समाधान आहे.
चौकट
...अन्यथा माफी मागा
ठाकूर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे पुढील पंधरा दिवसात जनतेला द्यावेत, अथवा जाहीर माफी मागावी, अन्यथा कायदेशीर मार्ग अवलंबू असेही चांदोस्कर यांनी ठणकावले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.