कोकण

आजगाव प्रशाळेच्या कंपाउंडची माजी विद्यार्थ्यांकडून रंगरंगोटी

CD

swt284.jpg
20472
आजगाव ः माजी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून शाळेची रंगरंगोटी केली. (छायाचित्र ः मदन मुरकर)

आजगाव प्रशाळेच्या कंपाउंडची
माजी विद्यार्थ्यांकडून रंगरंगोटी
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २८ ः विद्या विहार इंग्लिश स्कूल, आजगाव येथील दहावी बॅच १९८९ च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. या माजी विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने शाळेच्या कंपाउंडची रंगरंगोटी करून शाळेच्या नावाचा नवीन फलक बसवून दिला. या उपक्रमासाठी माजी विद्यार्थ्यांनी कोणतीही स्वतः आर्थिक सहकार्य केले. तसेच प्रत्यक्ष श्रमदानही केले.
अनेक वर्षांनंतरही आपल्या शाळेबद्दल असलेली जिव्हाळ्याची भावना आणि कृतज्ञतेचे दर्शन या उपक्रमातून घडले. शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व प्रसन्न झाल्याने शाळेच्या सौंदर्यात लक्षणीय भर पडली आहे. या कामात नववीच्या विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग घेत रंगकामासाठी मदत केली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल लोक कल्याण शिक्षण संस्था व विद्या विहार इंग्लिश स्कूल यांच्या वतीने १९८९ बॅचचे माजी विद्यार्थी व नववीच्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे माजी विद्यार्थी आणि शाळा यांचे नाते अधिक दृढ होत असून सध्याच्या विद्यार्थ्यांनाही समाजोपयोगी कार्याची प्रेरणा मिळत असल्याचे मत प्रशालेचे मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

IND vs AUS: विश्वविजेत्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला होणार सुरुवात; पाहा संपूर्ण वेळापत्रक अन् Live Telecast डिटेल्स

Solid Waste Rules: घन कचरा व्यवस्थापन नियम बदलणार! ओला आणि सुका कचरा आता वेगवेगळ्या दिवशी घेणार; सुचनांचे उल्लंघन केल्यास दंड

SCROLL FOR NEXT