swt2821.jpg
20505
प्रवीण भोसले
सिंधुदुर्गाची राजधानी उभारण्यात योगदान
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तबगार नेता आणि खऱ्या अर्थाने ‘विकासपुरुष’ गमावला आहे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली असून मी माझा जवळचा मित्र गमावला आहे. ते केवळ माझे सहकारी नव्हते, तर आमचे कौटुंबिक स्नेहसंबंध होते. शरद पवार आणि माझ्यामध्ये ते एका मजबूत दुव्याप्रमाणे काम करत असत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण जडणघडणीत आणि विकासाच्या प्रक्रियेत त्यांचा वाटा सिंहाचा होता. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची विलक्षण क्षमता होती, म्हणूनच त्यांना विकासपुरुष म्हणून ओळखले जात असे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची राजधानी उभारण्यासाठी त्यांनी मला नेहमीच मोठे प्रोत्साहन दिले होते. मी राजकारणात टिकून राहावे आणि जनतेची कामे करावीत, यासाठी त्यांनी मला नेहमीच मोठ्या भावाप्रमाणे साथ दिली. अजितदादांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची पूर्ण क्षमता होती आणि ते नक्कीच मुख्यमंत्री बनणार होते. मात्र, काळाने त्यांच्यावर अत्यंत दुर्दैवी घाला घातला. नियतीच्या या क्रूर निर्णयामुळे राज्याने एक सक्षम नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- प्रवीण भोसले, माजी राज्यमंत्री
-----------
swt2822.jpg
20506
दीपक केसरकर
लोकनेता गमावला
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखदायक असून, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजितदादा स्पष्टवक्ते आणि उत्तम प्रशासक होते. बोलण्यात कटुता असली तरी मनातून ते अत्यंत प्रेमळ होते. पहाटे कामाला सुरुवात करून जनतेची कामे मार्गी लावणारे ते लोकनेते होते. मी राष्ट्रवादीत असताना आमचे अतिशय निकटचे संबंध होते. राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा दादांना मुख्यमंत्री करावे म्हणून शरद पवार यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात मी होतो. मी पक्षात राहावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यांचे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. अर्थमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडण्याची जबाबदारी दिली होती. कठोर निर्णय घेताना ते मागे-पुढे पाहत नसत. राजकीय घडामोडींच्या वेळीही दादांनी ''हा आम्ही घडवलेला कार्यकर्ता आहे'' असे म्हणत माझे कौतुक केले होते.
- दीपक केसरकर, आमदार तथा माजी शिक्षणमंत्री, शिंदे शिवसेना
--------------
शब्दांकन ः रुपेश हिराप
--------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.