कोकण

अजितदादा पानासाठी

CD

-rat२८p१६.jpg-
२६O२०५१९
चिपळूण ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कलश पूजन यात्रेदरम्यान सावर्डेत उपमुख्यमंत्री अजित पवार आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी केलेला संवाद.
-rat२८p१७.jpg-
२६O२०५२०
कलश पूजन यात्रेदरम्यान स्वागतावेळी बालकलाकाराशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार.
-------
सावर्डेतील दौऱ्यात संवेदनशीलतेचे दर्शन

सावर्डे ः रथयात्रेच्या निमित्ताने २५ एप्रिल २०२५ ला उपमुख्यमंत्री अजित पवार सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेत आले होते. त्यांनी येथील विविध शाखांना भेट दिली आणि संवाद साधला. यानिमित्ताने त्यांच्यातील शिस्तप्रिय प्रशासक आणि संवेदनशील माणसाचे दर्शन झाले. त्यावेळच्या सहवासातील आठवणींना शरदचंद्र पवार कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनीत कुमार पाटील यांनी उजाळा दिला.
विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित यांच्या त्या दौऱ्याची प्रकर्षाने आठवण आली. सावर्डेत आल्यानंतर अजित पवार यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विविध शाखांना भेट दिली. त्यांच्या विविध स्वभावविशेष या निमित्ताने पाहायला मिळाले. त्यांना स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. येथील महाविद्यालयाला भेट देताना त्यांना लोंबकळणाऱ्या विजेच्या वाहिन्या दिसल्या. त्यांनी त्या वाहिन्या योग्य ठिकाणी अडकून ठेवण्याचा सल्ला मला दिला. प्रयोगशाळा दाखवतानाही त्यांनी मागच्या खिडकीतून सुद्धा इमारतीचा परिसर पाहिला. लहान मुलांना ते आपुलकीने वागवत होते. विशेष म्हणजे जेव्हा ते कोकणात येत असत तेव्हा आवर्जून कोकणी अळू, करवंदे, जांभूळ, आंबा यांचा आस्वाद घेत असत. तसेच ते कसे खायचे, याचीही माहिती ते घेत होते. त्यांना माणसांची खूप ओळख होते. अजित पवार आणि आमदार शेखर निकम यांचे जवळचे संबंध होते. त्यांच्या निधनाने सह्याद्री शिक्षण संस्थेमधील प्रमुख व्यक्ती हरपला, अशी भावना प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केली.
-----
चौकट
त्यांच्याबरोबरचा कोल्हापूरचा प्रवास
रत्नागिरी जिल्ह्यात शासकीय कामाचे उद्‍घाटन करण्यासाठी अजित पवार आले असता त्यांना रत्नागिरी ते कोल्हापूर विमानतळ या दरम्यान मोटारीतून नेण्याचे भाग्य मला लाभले. त्यावेळी ते अर्धा तास माझ्यासोबत बोलत होते. मोटारीतून जात असताना ते आजूबाजूची माहिती विचारून घेत होते. रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सेलचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या माध्यमातून पक्षाचे संघटन कसे वाढवता येईल, यासंबंधी त्यांनी या प्रवासादरम्यान मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा पालनकर्ता निघून गेल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

MSRTC Recruitment: तरुणांना सरकारी नोकरी मिळणार, एसटीत १७,७४२ पदांची मेगाभरती; परिवहन मंत्र्यांचा प्रस्ताव सादर

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

SCROLL FOR NEXT