कोकण

अजिदादा पानासाठी

CD

प्रतिक्रिया १
जनतेसाठी सतत धडपडणारा नेता
अजित पवार म्हणजे संघर्ष, नेतृत्व आणि जनतेसाठी सतत धडपडणारा चेहरा होता. राज्याची ही हानी भरून न निघणारी आहे. अजित पवार यांच्याकडे मतदार संघातील विकास कामांसाठी शब्द टाकला आणि तो त्यांनी कधी नाकारला असे झाले नाही. राज्यात त्यांनी नेहमीच जातीय सलोखा जपण्यास प्राधान्य दिले. कार्यकर्त्याशी जोडलेली नाळ कधी तोडली नाही.
- शेखर निकम, आमदार चिपळूण
-------
एक शिस्तप्रिय नेता हरपला
संपूर्ण राज्याला चटका लावणारी ही दुःखद घटना आहे. स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय अनुभव व एक शिस्तप्रिय नेता म्हणून अजित पवार यांचा राजकारणात एक दबदबा होता. लोकसभा सदस्य, सात वेळा विधानसभा सदस्य, विविध खात्यांचे मंत्री आणि अनेक वेळा उपमुख्यमंत्री राहिले. वित्त, नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, ग्रामीण विकास यांसारखी महत्त्वाची खाती त्यांनी प्रभावीपणे हाताळली. त्यांच्या कार्यकाळात पाणी व्यवस्थापन, ऊर्जा प्रकल्प आणि आर्थिक नियोजन यांना विशेष महत्त्व देण्यात आले होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
--प्रशांत यादव, भाजप नेते, चिपळूण
---
नेहमीच वेळेचे बंधन पाळलेअजित पवार यांच्याशी १९८७ पासून राजकीय संबंध राहिले. जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे चिपळूण शहर आणि ग्रामिण भागातील विकासाची कामे घेऊन गेल्यावर त्यांनी ती मार्गी लावली. वेळेत कामे मार्गी लावण्यात त्यांच्याकडे विशेष क्षमता होती. एखादे काम होणार नसेल तर त्यास स्पष्टपणे नकार द्यायचे. त्यांनी आयुष्यात नेहमीच वेळेचे बंधन पाळले. प्रशासनावर त्यांनी मजबूत पकड ठेवली होती. शरद पवार यांच्यानंतर असा दुसरा नेता मी पाहिला नाही. त्यांच्या जाण्याने पुरोगामी महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे.
--रमेश कदम, माजी आमदार, चिपळूण
----------
शब्दाला पक्का असणारा नेता
अजित पवार यांचे संपूर्ण जीवनच कर्तव्यात कठोर, शब्दाला पक्का असणारा नेता अशीच राहिली. राज्याच्या विकासासाठी त्यांची नेहमीच धडपड राहिली. रोखठोक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख. शब्दाचे पक्के असणारे दादा हळवे मनाचे होते. राष्ट्रवादीत १५ वर्षे आणि विधिमंडळात ३४ वर्षे त्यांना जवळून अनुभवले आहे. ते मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्यातील अनेकांची इच्छा होती. मात्र या घटनेने सारी स्वप्ने धुळीस मिळाली. त्यांच्या निधनाने राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.
---भास्कर जाधव, आमदार, गुहागर
-------


अजित पवार यांच्या जाण्याने अल्पसंख्याक समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. अजित पवार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्थापन केलेली एक विशेष संस्था आहे. बार्टी, सारथी आणि महाज्योती च्या धर्तीवर ही संस्था स्थापन केली. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास आणि शैक्षणिक सवलती पुरवल्या जातात. मुस्लिम बहुल वस्तीचा विकास व्हावा, यासाठी अल्पसंख्याक विभागाकडून भरघोस निधी देण्यासाठी अजित पवार यांचा नेहमी प्रयत्न होता.
---जाकीर शेकासन, जिल्हाध्यक्ष, अल्पसंख्याक सेल
---

rat२८p१३.jpg-
P२६O२०५१६
कोकणी पदार्थ चाखल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गणेश धुरी यांच्याबरोबर काढलेला फोटो शेवटचा ठरला.
---------------

बोलक्या व्यक्तिमत्त्वाने महाराष्ट्राला अबोल केले !

प्रत्येक रत्नागिरी दौऱ्याच्या वेळी हमखास भेट झालेले नेते अजित पवार. राजकारणी असलेले दादा एक खवय्ये होते. कोणत्या पदार्थासोबत काय खावे याचे ते चांगले जाणकार होते. मांसाहारी जेवणाचा आनंद ते घ्यायचे तसे शाकाहारालासुद्धा तेवढीच पसंती द्यायचे. आमच्या भेटीत कोकणातील बऱ्याचं पदार्थांची अजित पवार यांनी आठवण काढली. त्यांची आई कोणते पदार्थ कशी बनवायची यावरसुद्धा चर्चा झाली. कोकण दौरा करायचा म्हणजे सर्व डाएट एका दिवसासाठी ते बाजूला ठेवायचे. कोकणी पदार्थ चाखल्यानंतर त्यांनी स्वतःहून जवळ घेत छान हसत फोटो दिला. हा फोटो शेवटचा ठरला. दादा तुम्हाला भावपूर्ण श्रध्दांजली.

-गणेश धुरी, हॉटेल व्यवसायिक, रत्नागिरी
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण सुरूच! मात्र LPG गॅस टंचाईमुळे हे शेअर्स आजही तेजीत

Summer Skincare Home Remedies: चेहऱ्यावरची चमक हरवलीय? उन्हाळ्यात त्वचा उजळवण्यासाठी करा ‘हे’ 7 सोपे घरगुती उपाय

Rahul Dravid: ‘द वॉल' राहुल द्रविड यांना जीवनगौरव पुरस्कार; बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात विश्वविजेत्या संघांचाही गौरव होणार

Shivaji University : ठरलं! शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीचा क्लायमॅक्स जवळ; पाहा मुलाखतीसाठी कुणा-कुणाची नावे शॉर्टलिस्ट? 115 अर्ज, पण संधी फक्त 25 जणांना

LPG Price Hike:सिलिंडरच्या दरवाढीमुळे सामान्यांना फटका! घरगुती सिलिंडर ६० तर व्यावसायिक सिलिंडर ११४ रुपयांनी महाग; आर्थिक गणित बिघडलं..

SCROLL FOR NEXT