कोकण

चिपळूण पूरमुक्तीसाठी दिला होता १० कोटीचा निधी

CD

- rat२८p६.jpg-
२६O२०४८५
चिपळूण ः खरवते येथील कृषी महाविद्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यवरांसमवेत भेट दिली होती.
----
चिपळूण पूरमुक्तीसाठी दिला १० कोटींचा निधी

चिपळूण ः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीच चिपळूण मतदारसंघातील विकासकामांना चालना देण्याची भूमिका घेतली. आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे चिपळूणच्या पुरमुक्तीसाठी वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ उपशासाठी राज्यभरातील उपलब्ध करून दिलेली जलसंपदाची यंत्रणा आणि पहिल्या टप्प्यातील १० कोटींचा निधी चिपळूणकरांच्या स्मरणात राहिली आहे. तसेच चिपळूण शहरासाठी दीडशे कोटी पाणी योजनेच्या कामासाठी अजित पवार यांचे योगदानही मोलाचे ठरले. याशिवाय गेल्या काही वर्षात चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील पाझर तलांवासाठी मिळालेले सहकार्य ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारे ठरले आहे.
चिपळूण शहर व परिसरात २०२१ मध्ये आलेल्या महापूरात सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेची अपरिमित हानी झाली. प्रलयकारी महापूरानंतर वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळाचा मुद्दा उपस्थित झाला. चिपळूण गाळमुक्त होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातत्याने प्रशासकीय बैठका घेतल्या. पहिल्या टप्प्यात तातडीने मिळालेला १० कोटींचा निधी लाखमोलाचा ठरला. क्रीडांगणाचा विकास, मतदार संघातील पाझर तलाव, तिवरे धरण दुरूस्ती, चिपळूण शहराची ग्रॅव्हिटी पाणी योजना, पर्यटन विकासातील कामे, नलावडे बंधारा, सावर्डे येथे ९० कोटीचे धरण, कोट्यावधीच्या पाणी पुरवठा योजना, तलावांचे सुशोभीकरण आदी विविध कामे मार्गी लागण्यासाठी अजित पवार यांचे मोलाचे योगदान होते. शहरातील रखडलेल्या बसस्थानकाच्या कामास अलीकडेच सुमारे सात कोटींचा निधी मिळवून देण्यात अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता.
शहरासाठी पर्यायी रस्ता म्हणून पेठमाप -मुरादपूर पुलासाठी पहिल्या टप्प्यात १२ कोटींचा निधी, त्यानंतर जोडरस्त्यासाठी ६ कोटींचा निधी देण्यात पुढाकार घेतला होता. अजित पवार यांना साद घालावी आणि त्यांनी तो शब्द पाळावा, अशा पद्धतीचे चिपळूणकरांचे नाते अनेकवर्षे जोडले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT