कोकण

कुडाळात दोन शिवसेनेमध्ये लढाई

CD

कुडाळ तालुक्यात दोन शिवसेनेमध्ये लढाई
नव्या चेहऱ्यांची गर्दी ः मतदारांचा कौल कोणाला ?
अजय सावंत ः सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २८ ः तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीत ९ जिल्हा परिषद आणि १८ पंचायत समितीमध्ये खरी लढत ही शिवसेना शिंदे विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी दुरंगी लढत होणार आहे. काही ठिकाणी ठाकरे शिवसेनेचे उमेदवार सुद्धा तेवढ्याच ताकदीचे आहेत. विशेषतः नव्या उमेदवारी संख्या यावेळी अधिक असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषद मतदारसंघात नऊ मतदारसंघ येतात. आंब्रड या जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना विरुद्ध ठाकरे शिवसेना अशी दुरंगी लढत आहे. विशेष म्हणजे, महायुतीच्या उमेदवार व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते विरुद्ध ठाकरे शिवसेनेच्या सेजल परब या निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी स्थानिक उमेदवार असला तरी महायुती महत्त्वाची मानली जाणार आहे. महायुतीच्या माध्यमातून कोण आपले वर्चस्व प्रस्थापित करतो, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. कार्यकर्ते, मतदार यांच्या गाठीभेटी घेणे यावर भर दिसत आहे. नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघात ‘काटे की टक्कर’ अपेक्षित आहे. राजकारणातील ज्येष्ठ व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते हे शिवसेनेतून तर गाव पॅनेल व शिवसेना पुरस्कृत रुपेश पावसकर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत.
या ठिकाणी ठाकेर शिवसेनेचे विजय लाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने पावसकरांचे पारडे जड दिसते. कारण या ठिकाणी बऱ्यापैकी ठाकरे शिवसेनेची ताकद आहे. तसेच स्थानिक उमेदवार हा मुद्दा केल्यामुळे ही चुरशीची होणे अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, राजकारणातील गुरू आणि शिष्य हे एकमेकांच्या विरोधात दिसून येत आहेत. या ठिकाणी महायुती गावाच्या बाजूने मतदान करते की शिवसेनेचे उमेदवार संजय पडते यांना झुकते माप देते, हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. पावसकर यांना मिळालेले नारळ चिन्ह आणि शिवसेनेचा धनुष्यबाण यांचा प्रचार करताना पावसकर यांना मिळालेल्या चिन्हानुसार त्यांना अधिक मेहनत करावी लागणार आहे; मात्र ही लढत सहजसोपी निश्चितच नाही. ही निवडणूक स्थानिक उमेदवार या मुद्द्यावर जास्त भर देणारी आहे. पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत अपेक्षित आहे. भाजप-शिवसेनेचे पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, ठाकरे शिवसेनेचे गंगाराम सडवेलकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेतृत्व गजानन राऊळ निवडणुकीला सामोरे जात आहेत. आकेरकर विद्यमान सरपंच असल्यामुळे तसेच सडवेलकर हे सुद्धा तेवढेच ताकदीचे उमेदवार असल्यामुळे ही दुरंगी लढत अटीतटीची होणार आहे. शिवाय मनसेची पिंगुळीमध्ये बांधणी चांगली असल्यामुळे आणि गजानन राऊळ हा युवा चेहरा असल्याने मनसेला किती मते मिळतात, यावर वरील दोन उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. तिन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने प्रचारात मुसंडी मारली आहे. विकासाचे विविध मुद्दे घेऊन प्रचार सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये ठाकरे शिवसेनेकडून शिंदे शिवसेनेत येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याचा फटका ठाकरे शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. महायुतीचे सत्तास्थाने राज्य, केंद्रात तसेच नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेमध्ये असल्यामुळे जिल्हा परिषदेत मतदार कोणत्या बाजूने कौल देतो, हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे. माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात तिरंगी लढत असली तरी शिवसेना महायुतीचे युवा नेतृत्व रुपेश कानडे आणि ठाकरे शिवसेनेचे रमाकांत ताम्हाणेकर यांच्यात दुरंगी लढत आहे. तिसरा उमेदवार प्रसाद नार्वेकर (अपक्ष) माणगावमधील असल्यामुळे त्यांना किती मते मिळतात आणि कानडे व ताम्हाणेकर यांच्या दुरंगी लढतीत मिळणाऱ्या मतांचा विचार करता या ठिकाणी टक्कर अपेक्षित आहे. ताम्हाणेकर यांनी यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेले आहे, तर कानडे हे जिल्हा परिषदेला नवीन चेहरा म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघात दुरंगी लढत असून ठाकरे शिवसेनेचे सखाराम खोचरे आणि शिवसेना महायुतीचे दीपक नारकर  निवडणूक रिंगणात आहेत. या ठिकाणी काँग्रेस पक्ष सुध्दा मजबूत आहे. ही निवडणूक दुरंगी आणि अटीतटीची अपेक्षित आहे.
वेताळबाबर्डे मतदारसंघात शिवसेना-महायुतीचे रांगणा तुळसुली माजी सरपंच नागेश आईर आणि ठाकरे शिवसेनेचे बाजीराव झेंडे निवडणूक रिंगणात आहेत. दोन्ही उमेदवार स्थानिक असल्यामुळे ही निवडणूक रंगतदार असली तरी या ठिकाणी शिवसेना मजबूत असल्याचे दिसते. मागील निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचे नागेंद्र परब मोठ्या फरकाने विजयी झाले होते. तो करिष्मा यावेळी ठेवण्यात ठाकरे शिवसेनेला यश येते काय? हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे. अलीकडेच आमदार राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासकामे  मार्गी लागली आहेत आणि लागत आहेत. त्यामुळे आईर हे तेवढेच ताकदीचे उमेदवार आहेत. ओरोस जिल्हा परिषद मतदारसंघात भाजप-शिवसेना महायुतीच्या सुप्रिया वालावलकर आणि ठाकरे शिवसेनेच्या जान्हवी सावंत निवडणूक रिंगणात आहेत. ठाकरे शिवसेनेला आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी कडवी झुंज द्यावी लागणार, हे निश्चित आहे. तेंडोली मतदारसंघात महायुतीच्या आरती पाटील आणि ठाकरे शिवसेनेच्या सुजाता गावडे निवडणूक रिंगणात आहेत. येथे पाटील यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे. कारण तेंडोली मतदारसंघ ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो; मात्र दोघांनाही निवडणूक लढवण्यासाठी फार प्रयत्न करावे लागणार आहे.

चौकट
पावशीची निवडणुक लक्षवेधी
पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत शिवसेना-महायुतीचे तुकाराम उर्फ दादा साईल आणि ठाकरे शिवसेनेचे अमरसेन सावंत यांच्यातच आहे. दोन्ही उमेदवार ताकदीचे असल्यामुळे या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. आमदार नीलेश राणेंचे खास निकटवर्तीय म्हणून दादा साईल ओळखले जातात. या मतदारसंघात कोण बाजी मारतो, हे तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना

Ajit Pawar Death: आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

Ajit Pawar Passed Away: अलविदा दादा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज बारामतीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, राज्यात शोकाकूल वातावरण

Ajit Pawar Death: कामाचा माणूस गेला; सोलापूरकर भावुक, साेलापुतील चौकाचौकांत उभारले बॅनर!

Minister Mkarand Patil: महाराष्ट्राच्या कामाचा माणूस...

SCROLL FOR NEXT