20576
नेत्र तपासणी शिबिरास
तारकर्ली येथे प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २८ : येथील लायन्स क्लब, डॉ. गद्रे नेत्र रुग्णालय व मोतीबिंदू शस्त्रक्रिया सेंटर, मालवण आणि माघी गणेश उत्सव मंडळ, तारकर्ली यांच्या संयुक्त विद्यमाने महापुरुष मंदिर, तारकर्ली येथे आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी दहा गरीब व गरजू रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
या नेत्र तपासणी शिबिरासाठी डॉ. गद्रे नेत्र रुग्णालयाचे डॉ. अनिरुद्ध तेली, मालवण सेंटर इन्चार्ज वेदा माणगावकर, कर्मचारी वैभव माणगावकर, मधुरा चव्हाण यांचे सहकार्य लाभले आहे. गरजू रुग्णांना लायन्स क्लब सदस्य महेश अंधारी व गणेश प्रभुलीकर यांच्या सहकार्यातून चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, सदस्य महेश अंधारी, गणेश प्रभुलीकर, राजा शंकरदास, नंदिनी गावकर, जयश्री हडकर तसेच माघी गणेशोत्सव मंडळ, तारकर्लीचे सदस्य किशोर कुबल, सतीश टिकम, धोंडी कांदळगावकर, कुणाल बापर्डेकर, निवृत्ती कोळंबकर आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.