कोकण

कंटेनर उलटून महामार्ग ३ तास ठप्प

CD

-rat२८p१५.jpg-
P२६O२०५१८
रत्नागिरी ः हातखंबा येथील घाटातील वळणावर कलंडलेला कंटेनरमुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा.
-rat२८p१४.jpg-
P२६O२०५१७
रत्नागिरी ः कंटेनरला क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून बाजूला करण्यात आले.
-----
कंटेनर उलटून महामार्ग तीन तास ठप्प
हातखंब्यात तीव्र चढावावर अपघात ; वाहनांच्या रांगा
सकाळ वृत्तेसवा
रत्नागिरी, ता. २८ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा घाटातील वळणावर कर्नाटकहून रत्नागिरीकडे येणारा कंटेनर उलटून अपघात झाला. वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. यामुळे महामार्गावरिल वाहतूक तीन तास विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. क्रेन आल्यानंतर उलटलेला कंटेनर सरळ करून रस्त्याच्या बाजूला लावण्यात आला. तेव्हा तीन तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.
हातखंबा येथे ही घटना आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंटेनर चालक शांतिलाल राठोड (रा. तांडा, कर्नाटक) कंटेनर कर्नाटकहून रत्नागिरीच्या दिशेने येत होता. कंटेनर सिमेंटच्या पोत्यांनी भरला होता. हातखंबा येथील वळणावर चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने तो रस्त्यामध्ये उलटला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. कंटेनर रस्त्यात आडवा झाल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण व वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
महामार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यासाठी क्रेन मागविण्यात आल्या. दोन क्रेनद्वारे उलटलेला कंटेनर रस्त्याच्या बाजूला घेऊन विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या अपघातात कंटेनर चालक शांतिलाल राठोड हा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DGGIचा कारभार विकृत आणि मनमानी! कारवाई रद्द करा अन् जप्त रोकड व्याजासह परत द्या; मुंबई हायकोर्टानं फटकारलं

Latur Highway Safety Issue: किल्लारी राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका वाढला; संरक्षणभिंत व पथदिव्यांची नागरिकांची मागणी

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गॅस मिळवण्यासाठी नागरिकांच्या लागल्या रांगा

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

SCROLL FOR NEXT