swt2912.jpg
20709
घारपी ः येथे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर केले.
घारपी प्राथमिक शाळेचे
स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २९ ः घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अवघ्या १८ विद्यार्थ्यांनी विविध ४८ सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रामपंचायत सदस्य आनंद गावडे ,स्वाती गावडे, शाळा व्यवस्थापन उपाध्यक्षा यशोदा गावडे, पोलिस पाटील समृद्धी गावडे,आशा सेविका उत्तरा नाईक , अंगणवाडी सेविका संजना गावकर, अमृता कविटकर, विजय गावकर, शिवराम गावडे, दिपक गावडे, हरिश्चंद्र गावडे, मधुकर गावडे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर नृत्य, नाट्य, दशावतार, विनोदी आणि देशभक्तीपर सादरीकरणांनी रंगत वाढवली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.
यावेळी शाळेतील सर्व १८ विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांतील सहभाग व यशाबद्दल सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. लक्ष नाईक यांना आदर्श विद्यार्थी तर स्वप्नाली गावडे यांना आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांच्या ‘ज्ञानगंगा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत कला, शिक्षण व संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे हे स्नेहसंमेलन यशस्वी झाल्याचे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे घारपी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन अविस्मरणीय ठरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.