रत्नागिरीत उद्या बालनाट्य महोत्सव
‘ड्रीम्स इव्हेंट’चा उपक्रम; कोल्हापूर-देवगडमधील नाटकांचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३०ः बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील ‘ड्रीम्स इव्हेंट’तर्फे बालप्रेक्षक आणि पालकांसाठी चार संस्कारक्षम बालनाट्य महोत्सवाचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी (ता १) फेब्रुवारीला सकाळी ११ ते ४ या वेळेत शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार आहे. येथील पटवर्धन हायस्कूल, दामले विद्यालय-रत्नागिरी, युथ फोरम-देवगड, अलंकार अकादमी-कोल्हापूर येथील बालनाट्यांचा समावेश आहे.
या बालनाट्य महोत्सवाच्या उद्घाटनानंतर येथील पटवर्धन हायस्कूलची ‘धोंड’ बालनाट्य सादर होईल. विद्यार्थी विदुला मुल्ये, विभा कडव, शांभवी रेमणे, रमा कानविंदे, समृद्धी सावंत, त्वीशा भाटकर, ऋषिकेश मोंडकर, शौर्य मयेकर, दत्तात्रय नार्वेकर, समर्थ कोळी हे बालकलाकार नाट्यकृती सादर करणार आहेत. त्यानंतर देवगड येथील युथ फोरमतर्फे ‘लगोरी’ बालनाट्य होईल. यामध्ये स्वरा भुजबळ, मीरा भुजबळ, ओवी बापट, आर्या सावंत, कस्तुरी कांबळी, सावी मुद्राळे, सम्यक सकपाळ, अधिराज बलवान, ध्रुव दाभोळकर, मयंक धुरी, पार्थ नलावडे, सार्थक तेली या बालकलाकारांचा समावेश आहे. तसेच ‘चेटकिणीच्या बंगल्यात’ हे कोल्हापूर येथील अलंकार कला अकादमीचे बालनाट्य सादर होईल. यामध्ये आरोही गुळवणी, मुग्धा शिंदे, आरोही पवार, गार्गी गुळवणी, सारंग सोनुले, सोहम जाधव, वीरेन कापडी, स्वर विचारे, चैतन्य आयरेकर, अविराज मांगोरे, अनय देशपांडे, समर्थ घाटगे, समर्थ जगताप या बालकलाकारांचा समावेश आहे. त्यानंतर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १५ अर्थात् दामले विद्यालयाचे विद्यार्थी ‘काय ते जुनं’ ही नाट्यकृती सादर करणार आहेत. यामध्ये अर्णव सरपोतदार, सोहम कदम, आर्षती कारेकर, श्रवण महाले, गार्गी शेलार, सावनी सरपोतदार, श्रीराम पळसुलेदेसाई, स्वयंम शिंदे, सिद्धेश मोहकर, अनन्या मांजरेकर, अनन्या देवस्थळी, तेज काळे आदी बालकलाकारांचा समावेश आहे. रविवारी होणाऱ्या या संस्कारक्षम बालनाट्याचा आस्वाद रसिकांनी व पालकांनी घ्यावा, असे आवाहन ड्रीम्स इव्हेंटतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.