- rat29p19.jpg-
26O20663
संगमेश्वर ः देवरूख येथे आयोजित स्पर्धेतील पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांसोबत प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील आणि तहसील अधिकारी व कर्मचारी.
---
देवरूखमध्ये मतदार जागृती उपक्रम
विद्यार्थ्यांचा सहभाग; प्रश्नमंजूषा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः आठल्ये–सप्रे–पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती अंतर्गत प्रश्नमंजूषा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर सादरीकरण व प्रदर्शन अशा स्पर्धा घेण्यात आल्या. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
देवरूख येथे आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क, लोकशाहीतील नागरिकांची जबाबदारी, निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया आदी विषयांवर प्रभावी सादरीकरण केले. रांगोळी व पोस्टर स्पर्धांमधून मतदानाबाबत जनजागृती करणारे संदेश आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थी व स्वयंसेवकांना मतदार शपथ देण्यात आली. मी माझा मतदानाचा हक्क निर्भयपणे व जबाबदारीने बजावीन, असा संकल्प या वेळी करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी महाविद्यालय आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीवर आधारित तहसील कार्यालय येथे पथनाट्य सादर केले.
----
चौकट
स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी
मतदार जनजागृती अभियानांतर्गत आयोजित स्पर्धांचा निकाल पुढीलप्रमाणे- निबंध स्पर्धा (प्रथम, द्वितीय, तृतीय नुसार) : ध्रुवी कांगणे, सोलिहा आंबेडकर, ऋतुजा गुरव. रांगोळी स्पर्धा : हर्षदा नार्वेकर, आदित्य कानार, तन्वी घाणेकर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.