कोकण

जिल्ह्यात सव्वा लाख महिला झाल्या लखपती दीदी

CD

जिल्ह्यात सव्वा लाख ‘लखपती दीदी’
उमेद अभियान; महिला सक्षमीकरणात प्रशासनाचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाच्यावतीने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात मोठी प्रगती झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख २५ हजार ८५६ महिला लखपती दीदी बनल्या असून, प्रशासनाने दिलेले उद्दिष्ट यशस्वीपणे ओलांडले आहे.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या (उमेद) माध्यमातून ग्रामीण महिलांचा सर्वांगीण विकास साधणे, हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजारांहून अधिक स्वयंसहाय्यता समूह स्थापन झाले असून, त्यामध्ये सुमारे दीड लाखांहून अधिक महिलांचा समावेश आहे. या समूहांच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार आणि स्वावलंबनाचे नवे मार्ग उपलब्ध झाले आहेत.
महिला सशक्तीकरणावर भर, आर्थिक साक्षरता, कौशल्य विकास आणि क्षमता बांधणीच्या जोरावर महिलांनी स्वतःचे लघुउद्योग उभे केले आहेत. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून शाश्वत उत्पन्न मिळवून देणे आणि त्यांना ‘लखपती’ करून समाजासमोर आदर्श निर्माण करणे, ही या अभियानाची महत्त्वाची भूमिका आहे. जिल्ह्यात सुरुवातीला १ लाख १० हजार ३५९ महिलांना लखपती दीदी बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात १ लाख २५ हजार ८५६ महिलांनी हा टप्पा गाठला आहे. या अभियानाचा लाभ घेण्यासाठी महिला ग्रामीण भागातील उमेद समूहाची सदस्य असणे आवश्यक आहे. जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष तसेच समुदाय संसाधन व्यक्तींच्या (CRP) मदतीने महिला विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकतात.
--------
चौकट
तालुकानिहाय आकडेवारी संख्या
तालुका* महिला
चिपळूण* २० हजार १३८
रत्नागिरी* १९ हजार ८५८
दापोली* १७ हजार ९०३
राजापूर* १५ हजार २८६
संगमेश्वर* १४ हजार ४२६
गुहागर* १३ हजार ७६१
खेड* १२ हजार ४२८
लांजा* ८ हजार २०९
मंडणगड* ३ हजार ८४७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Union Budget 2026 Live : गरीबी दूर करण्यावर लक्ष्य केंद्रीत केलंय - अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Union Budget: फिस्कल डेफिसिट, राजकोषीय धोरण अन्... केंद्रीय अर्थसंकल्पातील कठीण आर्थिक शब्दांचे सोपे अर्थ बजेट आधीच समजून घ्या...

Chhatrapati Sambhajinagar Crime:‘मोस्ट वाँटेड’ ब्रोकर राजू जाधव जेरबंद; बनावट महिलांना उभे करून ७० लाखांचा जमीन गैरव्यवहार!

Epstein Files Controversy : एपस्टीन फाइल्समध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख? काँग्रेसच्या आरोपानंतर परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दिलं स्पष्टीकरण...

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प व्हेनेजुएलाचं तेल जगभरात विकण्यासाठी उतावीळ; म्हणाले - भारताचा खरेदीसाठी पुढाकार, चीनचंही स्वागत

SCROLL FOR NEXT