कोकण

एनएसएस शिबिरात सायबरवर प्रबोधन

CD

एनएसएस शिबिरात
सायबरवर प्रबोधन
रत्नागिरी ः देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या शिबिरामध्ये ‘सायबर संस्कार’ या विषयावर सायबरतज्ज्ञ डॉ. अक्षय फाटक यांनी मार्गदर्शन केले. केवळ तंत्रज्ञान वापरणे म्हणजे प्रगती नव्हे तर ते वापरताना आपण कोणते संस्कार पाळतो आणि किती सतर्क राहतो, हे महत्त्वाचे आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘ओटीपी’ कोणालाही शेअर न करणे, अनोळखी लिंक्सवर क्लिक न करणे आणि सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती टाकताना मर्यादा पाळणे आवश्यक आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर होणारी फसवणूक, सायबर गुन्ह्याला बळी पडल्यास १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा सायबर पोर्टलवर तक्रार कशी करावी, असे आवाहन त्यांनी केले.


गोगटे महाविद्यालयात
संस्कृत कथावाचन
रत्नागिरी ः गोगटे- जोगळेकर महाविद्यालयामध्ये वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन पंधरवडा साजरा होत आहे. या निमित्त संस्कृत विभागातर्फे कथावाचन उपक्रम आयोजित करण्यात आला. कोणत्याही संस्कृत कथेचे विद्यार्थ्यांनी प्रकट वाचन करणे, असे या उपक्रमाचे स्वरूप होते. कार्यक्रमाला बाबूराव जोशी ग्रंथालयाचे सहाय्यक ग्रंथपाल उत्पल वाकडे, कला शाखा उपप्राचार्या व संस्कृत विभागप्रमुख डॉ. कल्पना आठल्ये, प्रा. स्नेहा शिवलकर, प्रा. प्रज्ञा भट, प्रा. प्रीती टिकेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. वाकडे यांनी अभ्यास विषयासोबतच इतर विषयांच्या पुस्तकांचेही वाचन करणे अधिक ज्ञानवर्धक आहे, असे सांगितले आणि अवांतर वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.

सत्यसाई समितीतर्फे
रक्तदान शिबिर
रत्नागिरी ः शासकीय तंत्रनिकेतन येथे श्री सत्यसाई सेवा समिती, रत्नागिरी आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे शासकीय रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात ३० जणांनी रक्तदान केले. शिबिराला शासकीय रुग्णालयाचे डॉ. कांबळे, सहकारी उपस्थित होते. शासकीय तंत्रनिकेतन प्राचार्य सीमीकेरी, औषध निर्माणशास्त्र विभागप्रमुख काणे, प्रा. म्हस्के, श्री सत्यसाई सेवा समितीचे प्रमुख भूषण बेलवलकर, नलिनी बोंद्रे, नीलेश मेत्री, अलुमनी असोसिएशनचे उत्साही चवंडे, पराग पानवलकर, चंद्रशेखर शिंदे, संजय साळवी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जांभेकर विद्यालयात
ग्रंथ महोत्सव उत्साहत
रत्नागिरी ः सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात मराठी भाषा पंधरवड्याचा समारोप व ग्रंथ महोत्सव नुकताच झाला. नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुधाकर मुरकुटे यांनी ग्रंथ महोत्सवाचे उद्‍घाटन केले. मुख्याध्यापिका संजना तारी यांनी स्वागत केले. हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या कियांश गोरिवले, अमेय कारकर, विघ्नेश कारकर तसेच उत्तेजनार्थ हर्ष पांचाळ यांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. समारोपावेळी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या परिसरातून काढलेल्या या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा देत उत्स्फूर्त सहभाग घेतला. ग्रंथप्रदर्शनाची जबाबदारी ग्रंथपाल आसावरी चव्हाण यांनी सांभाळली.

कीर महाविद्यालयात
संशोधनवर व्याख्यान
रत्नागिरी ः देवरूखच्या आठल्ये, सप्रे, पित्रे महाविद्यालयातील डॉ. प्रशांत नारगुडे यांनी सामाजिक संशोधन आणि संशोधनाचे पद्धतीशास्त्र या विषयी देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना माहिती दिली. समाजशास्त्र विभाग आणि आयक्युएसी विभागाच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. नारगुडे यांनी सामाजिक संशोधनाचे प्रकार, संशोधन पद्धती, तथ्य संकलनाचे तंत्र, संशोधन नीतिमत्ता, आणि संशोधनाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. या वेळी प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला विभागप्रमुख ऋतुजा भोवड, आयक्युएसी समन्वयक प्रा. राखी जाधव, समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. हर्षदा लिंगायत उपस्थित होते.

जोशी ग्रंथालयात
ग्रंथ प्रदर्शन
रत्नागिरी ः भारतीय राज्यघटना, लोकशाही आणि राजकीय व्यवस्था या विषयावर आधारित ग्रंथांचे प्रदर्शन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या (कै.) बाबूराव जोशी ग्रंथालयात भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम वाचनकट्टा येथे आयोजित केले. उद्‍घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले. या प्रसंगी उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. एस. डी. मधाळे, प्रा. नीलेश पाटील, प्रा. डी. एस. कांबळे, ग्रंथपाल किरण धांडोरे, प्राध्यापक, विद्यार्थी आणि ग्रंथालय कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक वाचकगटाचा विद्यार्थी ओंकार आठवले याने केले.

‘डीजीके’च्या विद्यार्थ्यांचे
बसस्थानकात पथनाट्य
रत्नागिरी ः देव, घैसास, कीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मध्यवर्ती एसटी बसस्थानक परिसरात पथनाट्य सादर करून प्रवाशांचे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मिथिला वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी अभिनयातून मतदानाची प्रक्रिया, मतदानाचे अधिकार आणि प्रलोभनांना बळी न पडता मतदान करण्याचे आवाहन केले. महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रा. स्मार्था कीर यांनी सर्वांना मतदार प्रतिज्ञा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inspirational : Glenn Phillips ची पायलट बनण्यामागची कहाणी; ८ महिने क्रिकेटपासून दूर, पण पठ्ठ्याला स्वस्थ कुठे बसवत होतं...

सिरियलमध्ये आली देशभक्त नागिण! इस्रोच्या रॉकेटला केला सलाम, नेटकऱ्यांनी एकता कपूरला केलं ट्रोल

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

अनधिकृत गॅस गोदामातून सिलिंडरची विक्री, पुरवठा विभागाचा छापा; ५७ सिलिंडर केले जप्त, कुठं झाली कारवाई?

Maharashtra Weather: महाराष्ट्राच्या 'या' भागांमध्ये गुरुवारी पावसासह गारपीट; हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT