कोकण

बांदा-निमजगा शाळा पाचव्या दिवशीही बंद

CD

20926
बांदा ः निमजगा येथील बंद असलेली शाळा.


बांदा-निमजगा शाळा पाचव्या दिवशीही बंद

अवजड वाहतूक प्रश्‍न; व्यवस्थापन समितीसह प्रशासनाकडून ठोस कार्यवाही नाही

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या लगतच्या रस्त्यांवरून सातत्याने सुरू असलेल्या अवजड वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी सलग पाचव्या दिवशीही शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. पालकांनी मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय एकमताने घेतल्याने ४२ पटसंख्या असलेल्या शाळेत आज १०० टक्के मुलांची अनुपस्थिती होती.
शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मीदास ठाकूर यांनी आज शाळेला भेट देऊन पालकांशी चर्चा केली. मात्र, पालक आपल्या मागणीवर ठाम राहिल्याने श्री. ठाकूर यांनी याबाबत शिक्षण विभागाला लेखी कळविले आहे. येथील पालकांचे ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर सलग पाचव्या दिवशी साखळी उपोषणही सुरू आहे. शाळेजवळून मोठे डंपर, ट्रक आदी अवजड वाहने मोठ्या प्रमाणावर ये-जा करत असून, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाले असून, संरक्षक भिंत किंवा सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था नसल्याने अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात यापूर्वी ग्रामपंचायत, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडे वारंवार निवेदने दिली होती. तसेच गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पंचायत समिती सावंतवाडी यांना लेखी इशाराही दिला होता. मात्र, अद्याप कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे.
-----
...तर प्रशासन जबाबदार!
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने योग्य कार्यवाही करावी, अन्यथा शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे. आंदोलनानंतर उद्‌भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद आहे. या मागणीसाठी ग्रामस्थ व पालकांनी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (ता. २६) पासून साखळी उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, आज सलग पाचव्या दिवशीही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविता शाळा बंद आंदोलन सुरूच ठेवले असून, आज शाळेतील ४२ पैकी ४२ विद्यार्थी अनुपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs ENG SF: नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने! सूर्याने सांगितला आम्हाला हवं तेच झालं; Playing XI मध्ये बघा काय बदल झाला

Petrol Diesel Shortage: पेट्रोल, डिझेलची खरंच टंचाई आहे का? केंद्र सरकारकडून आलं स्पष्टीकरण

ललित प्रभाकर–विदुला चौघुलेच्या स्टायलिश लुकची चर्चा! ‘सुट्टा रोल’ पार्टी ट्रॅक प्रेक्षकांच्या भेटीला

Akhil Bharatiya Natya Parishad : घटनेला हरताळ फासून पदे वाटली? नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचा कारभार वादाच्या भोवऱ्यात

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

SCROLL FOR NEXT