कोकण

‘माझं घर त्यांनी उभं केलंय’

CD

20929

‘माझं घर त्यांनी उभं केलंय’

अजितदादांसाठीच्या भावना; कुडाळात सर्वपक्षीयांकडून आदरांजली

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३० ः ‘एकवेळ माझ्या वडिलांचं निधन झालं असतं तर मी थांबलो असतो; पण आमचे अजितदादा गेले, त्यामुळे मी थांबू शकत नाही. माझं घर त्यांनी उभं केलंय!, असे भावोद्‌गार काढत सावंतवाडीत एका कंत्राटदाराकडे काम करणारा चालक माडखोल येथे आपला डंपर तसाच उभा करून थेट बारामतीकडे अजितदादांच्या अंत्यसंस्कारासाठी निघून गेल्याचा किस्सा सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत भावूक झाले.
येथील मराठा समाज सभागृहात जिल्ह्यातील सर्वपक्षीयांतर्फे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभेचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष अमित सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एम. के. गावडे, सावळाराम अणावकर, कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्यासह व्हिक्टर डांटस, नितीन वाळके, काका कुडाळकर, राजू राऊळ, अभय शिरसाट, राजन नाईक, शिवाजी घोगळे, आत्माराम ओटवणेकर, राजेंद्र राणे, सुंदर सावंत, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, द्वारकानाथ घुर्ये, विद्याप्रसाद बांदेकर, नम्रता कुबल, राकेश कांदे, जयराम डिगसकर, प्रा. अरुण मर्गज, रेवती राणे, लालू पटेल आदी उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते अणावकर म्हणाले, ‘लहान-थोरांशी अजितदादांची आपुलकी होती, स्पष्टवक्तेपणा आणि कामाबद्दल प्रचंड कळकळ होती. कोकणावर त्यांचे विशेष लक्ष होते.’ माजी आमदार नाईक म्हणाले, ‘अजितदादांचे गुण अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.’ भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी, आमच्या पिढीप्रमाणेच आजची तरुण पिढीदेखील दादांवर प्रेम करते. ते सोशल मीडियातूनही स्पष्टपणे दिसते. दादांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची अनेकांची इच्छा अपूर्णच राहिली, असे सांगितले. श्री. कुडाळकर यांनी अजितदादांच्या साधेपणावर प्रकाश टाकला. नगराध्यक्षा बांदेकर यांनी कुडाळवासीयांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT