rat३०p१२.jpg-
२६O२०८४२
सावर्डे: स्व. अजित पवार यांच्या निधनानिमित्त आयोजित शोकसभेत बोलताना शेखर निकम.
rat३०p१३.jpg-
२६O२०८४३
उपस्थित जनसमुदाय
----
अजितदादांच्या निधनाने ‘सह्याद्री’ परिवाराची हानी
आमदार शेखर निकम ः शोकसभेत अनेकांचा कंठ आला दाटून
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता.३०: निकम कुटुंबीयांचे शरद पवार यांच्याबरोबर अजित पवारांशीसुद्धा ऋणानुबंध जुळले. अजितदादांच्या निधनामुळे मतदार संघाबरोबर सह्याद्री परिवाराचेसुद्धा अतोनात नुकसान झाले आहे. माझे बाबा गोविंदराव निकम गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हाला कोणाचा आधार होता तो अजितदादांचा. तोच आता गमवला, अशी भावना आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
अजितदादा पवार याना आदरांजली वाहण्यासाठी शुक्रवारी सकाळी दहा वाजता आमदार शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात शोकसभा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूने स्पष्टवक्ता, प्रशासकीय अनुभव असलेला शिस्तप्रिय नेता गमावल्याची भावना सर्वच वक्त्यांच्या भाषणातून व्यक्त करण्यात आली. शोकसभेत बोलताना निकम यांच्यासोबत सर्वच वक्त्यांचा कंठ दाटून आला. निकम म्हणाले, अजितदादांनी चिपळूणच्या वाशिष्टी नदीतील गाळ उपशासाठी तसेच पाणीयोजनेसाठी प्रचंड काम केले. सावर्डेतील धरणासाठीसुद्धा त्यांनी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. समाजातील सर्व घटकासाठी दादा काम करत होते त्याचबरोबर ते कार्यकर्त्यांचीसुद्धा वैयक्तिक काळजी घेत होते.
अजित पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीविषयी व स्वभावाचे अनेक पैलू उलगडले. या शोकसभेस जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाचे प्रकाश देशपांडे, विजय गुजर, मिलिंद कापडी, जयद्रंथ खताते, नितीन ठसाळे, राजू महाडिक, विष्णुपंत सावर्डेकर आदी उपस्थित होते.
तानाजी चोरगे म्हणाले, माझ्या हयातीमध्ये अनेक मंत्री झाले; पण अजितदादांसारखे काम करण्याची पद्धत मी पाहिली नाही. ज्या वेळी त्यांना भेटण्याचा योग येत असे त्या वेळी ते आवर्जून बँकेच्या संबंधित माझ्याकडे चौकशी करत असत. त्यांच्या विचारावर वाटचाल करत राहणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. ते लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयामध्ये आले त्या वेळी मला खूप उशिरा बोलावले, असे त्यांनी खंत बोलून दाखवली. वाचनालयाला येणाऱ्या सर्व समस्या त्यांनी तेथील मुख्याधिकारी यांना सांगून त्या तातडीने सोडवण्याचे आदेश दिले. जागच्या जागी निर्णय घेणारा नेता म्हणून अजित पवार कायम स्मरणात राहतील, असे प्रकाश देशपांडे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.