कोकण

सीटीइटी देणाऱ्या शिक्षकांकडून प्रतिज्ञापत्र घ्या

CD

rat३१p१.jpg-
२६O२१०२२
रत्नागिरी- जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी मनुज जिंदल आदी.
--------
सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांकडून प्रतिज्ञापत्र घ्या
मनुज जिंदल ः जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे कामकाज दिले आहे; परंतु, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) देणार आहेत त्यांच्याकडून तसे प्रतिज्ञापत्र घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या अनुषंगाने सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी सर्वसाधारण विश्वजित गाताडे, शिक्षणाधिकारी किरण लोहार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जिंदल म्हणाले, निवडणुकीसाठी आवश्यक असणारे उपलब्ध मनुष्यबळ, सीटीईटी परीक्षा, ती देणारे शिक्षक यांचा यात समावेश होता. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा देणारे जे शिक्षक आहेत त्यांना परीक्षेसाठी कार्यमुक्त करताना परीक्षा देणार असल्याबाबत त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे. त्यांच्या जागी मनुष्यबळ उपलब्ध करण्याबाबत कार्यवाही करावी. त्याबाबत नियोजन करावे. काही ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता वा अतिरिक्त मनुष्यबळ होत असल्यास त्याबाबत देखील सांगावे. नवीन अधिकारी-कर्मचारी नियुक्त करताना त्यांना प्रशिक्षण द्यावे. तसे नियोजन करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik News : सिलिंडरबाबत अफवा पसरवाल तर सावधान! नाशिक प्रशासनाचा कडक कारवाईचा इशारा

Latest Marathi News Live Update : धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरात पुतळ्यावरुन तणावाचे वातावरण

लव्ह बर्ड.. मांजर अन् कोयत्याने वार ! पुण्यात शेजाऱ्यांमध्ये जुंपली, प्रकरण पोलीस ठाण्यात; बातमी वाचून डोक्यावर माराल हात

Jalna Maize Farmers Crises: खरीप हंगामातील मका घरातच; खरेदी बंद झाल्याने भोकरदन तालुक्यातील शेतकरी चिंतेत; कोटा संपल्याने मका खरेदी ठप्प

Palghar Accident: पोलिसांना घाबरून पळाले अन् ट्रॅकवर गेले, समोरून आलेल्या मालगाडीनं उडवलं; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT