कोकण

वैष्णवी फुटबॉल संघात

CD

-rat३१p४.jpg-
P२६O२१०४१
वैष्णवी पडवळे
----------
‘सेंट थॉमस’ स्कूलच्या वैष्णवीची
खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड

रत्नागिरी, ता. ३१ : कारवांचीवाडी येथील सेंट थॉमस स्कूलच्या वैष्णवी पडवळे हिची महाराष्ट्राच्या अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली आहे. सेंट थॉमस स्कूल फुटबॉल संघातून एकूण सहा मुलींची राज्य शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. त्यातून वैष्णवी पडवळेची महाराष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली. गुजरातमधील भावनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अस्मिता खेलो इंडिया झोनल फुटबॉल अंडर १३ संघामध्ये वैष्णवी आपली उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. महाराष्ट्रातून एकूण ३४ मुलींची राज्यस्तरीय खेलो इंडिया फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड करण्यात आली होती. या मुलींमधून १४ मुलींची महाराष्ट्र अस्मिता खेलो इंडिया फुटबॉल संघात निवड झाली आहे. त्यात वैष्णवीचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद परांजपे, सचिव धनराज मोरे यांचे मुलींच्या फुटबॉल संघासाठी वेळोवेळी विशेष सहकार्य करत आहेत.


चिंचखरी-फाटकवाडीत उद्या गुरूप्रतिपदा उत्सव
रत्नागिरी ः चिंचखरी फाटकवाडी येथील दत्तमंदिरात २ फेब्रुवारीला गुरूप्रतिपदा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ६:४५ आरती, ७ वा. नामजपाची सुरुवात, दुपारी १२:३० नंतर महाप्रसाद, सायं. ७ वा. नामजपाची सांगता, आरती, प्रार्थना, गाऱ्हाणे, प्रसाद होऊन उत्सवाची सांगता होणार आहे. नामजप सेवेत व गुरूप्रतिपदा उत्सवात भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फाटक कुटुंबीयांनी केले आहे

ज्येष्ठ नागरिक संघाच्या
विरंगुळा केंद्रासाठी भेट

रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाला विरंगुळा केंद्रासाठी साहित्य भेट देण्यात आली. इंटरनॅशनल लॉन्जेव्हिटी सेंटर ऑफ इंडिया (पुणे) यांनी घरडा केमिकल्स लिमिटेडमार्फत साथ निरामय आरोग्यासाठी २०२५-२६ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी या वस्तू दिल्या. यामध्ये स्मार्टटीव्ही, दोन कॅरम बोर्ड आणि तीन चेसबोर्ड भेट देण्यात आले. आयएलसीआयच्या रिसर्च को-ऑर्डिनेटर यशोदा पाध्ये यांनी ज्येष्ठांचे मार्मिक आरोग्य या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रम आयोजक सुशांत सोनवणे यांनी तंत्रसहाय्यक नंदकुमार सकट यांच्या साथीने नियोजन केले. संघाचे अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी कार्याध्यक्ष विजय निंबाळकर व उपाध्यक्ष पद्मजा बापट यांनी भेटवस्तू स्वीकारल्या. या विरंगुळा केंद्राचा लाभ सभासदांनी दुपारी ४ ते ६ या वेळेत घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुभाष थरवळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Ajit Pawar: अर्थ खातं फडणवीसांकडेच! सुनेत्रा पवारांकडे 'या' खात्यांची जबाबदारी

Thane: हाजीमलंग यात्रेसाठी पोलिसांचा अलर्ट! 'या' वेळेत मलंगगडावर जाण्यास बंदी, रोप-वेसह वाहतुकीची विशेष नियमावली जारी

Budget 2026 : क्रिप्‍टो कर आकारणीबाबत पुनर्विचार करण्‍याची गरज! बजेट 2026 मध्ये त्‍यासंदर्भात बदल करणे आवश्‍यक

U19 World Cup: भारताविरुद्ध जिंका, नाहीतर गाशा गुंडाळा, पाकिस्तानसमोर 'करो वा मरो'ची परिस्थिती; जाणून घ्या समीकरण

Bank Merger: सर्वात मोठा बँकिंग निर्णय! सार्वजनिक क्षेत्रातील 'या' दोन बँकांचे महाविलीनीकरण होणार; इतिहासात नवा अध्याय

SCROLL FOR NEXT