कोकण

कास दाभाळवाडीत बिबट्याची दहशत

CD

कास दाभाळवाडीत बिबट्याची दहशत

मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३१ : कास-दाभाळवाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास सुरू होणारा बिबट्याचा संचार थेट पहाटेपर्यंत सुरू राहत असून, तो मुक्तपणे वावरताना अनेक वेळा ग्रामस्थांच्या निदर्शनास आला आहे. परिणामी, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या भागात बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांत मांजरी, शेळ्या यांसारख्या पाळीव प्राण्यांना बिबट्याने भक्ष्य बनविल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीती पसरली असून, लहान मुले, वृद्ध आणि महिला यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, कास ग्रामपंचायतीचे सदस्य अजय भाईप यांनी वनविभागाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बिबट्याचा वावर वाढल्याची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ एकदाच परिसरात फेरी मारली; मात्र त्यानंतर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा आरोप त्यांनी केला. ग्रामस्थांनी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेकदा फोन उचलले जात नसल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
जर या परिसरात एखादी जीवितहानी झाली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा थेट सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. वनविभागाने केवळ थातूरमातूर कारवाई न करता तातडीने पिंजरा लावणे, गस्त वाढवणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे यांसारख्या ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
----
वनविभागाचे ग्रामस्थांना आवाहन
- बिबट्याचा वावर दिसताच तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी
- अफवा न पसरवता अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा
- वनविभागाच्या पथकास शोध व बंदोबस्तासाठी सहकार्य करावे
- पिंजरा, कॅमेरे किंवा गस्त लावताना अडथळा निर्माण करू नये
- संशयास्पद हालचाली आढळल्यास ग्रामपंचायत व वनविभागाशी संपर्क साधावा
-------
बिबट्यापासून घ्यावयाची काळजी
- रात्री एकट्याने बाहेर जाणे टाळावे
- लहान मुले व वृद्धांना सायंकाळनंतर घराबाहेर सोडू नये
- पाळीव प्राणी रात्री घराबाहेर मोकळे सोडू नयेत
- घराभोवती अनावश्यक झाडी व अंधार राहणार नाही याची दक्षता घ्यावी
- टॉर्च, लाईटचा वापर करूनच बाहेर पडावे
- बिबट्या दिसल्यास त्याच्याकडे धाव घेऊ नये किंवा दगडफेक करू नये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT