कोकण

कोकरे गटात घरोघरी प्रचारावर भर

CD

जिल्हा परिषद निवडणूक--लोगो

कोकरे गटात तिरंगी लढतीने चुरस
शिवसेना-राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये लढत; प्रबळ उमेदवारांमुळे उत्सुकता, घरोघरी प्रचारावर भर
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ३१ : चिपळूण तालुक्याच्या दक्षिणेकडील कोकरे जिल्हा परिषद गटात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कदम, शिवसेना (उबाठा) गटाचे संतोष चव्हाण व शिवसेना शिंदेगटाचे सिद्धार्थ कदम यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. सर्वच उमेदवार प्रबळ असल्याने येथील निवडणूक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. बहुजन समाज पार्टीचे विलास डिके या ठिकाणी नशीब आजमावत आहेत.
या मतदार संघात कोकरे व कुटरे असे दोन गण असून, कोकरे गणात कोकरे, वडेरू, नायशी, असुर्डे, आंबतखोल, हडकणी, खेरशेत, कुशिवडे या गावांचा समावेश आहे. या गणात १० हजार ४९८ मतदार आहेत. कुटरे गणात कुटरे, डेरवण खुर्द, डेरवण, नांदगाव खुर्द, नांदगाव, कोसबी, मुंढेतर्फे सावर्डे, फुरूस, येगाव, तळवडे, पाते, मजरेगोवळ, दुर्गवाडी, दुर्गवाडी खुर्द, मंजुत्री या गावांचा समावेश असून, या गणात ९ हजार ६१२ मतदार आहेत.
कोकरे जिल्हा परिषद गट शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथून शिवसेनेचे संतोष चव्हाण दोनवेळा तर त्यांची पत्नी एकवेळा निवडून आली आहे. त्यानंतर शिवसेनेमध्ये फूट पडून पूर्वीची शिवसेना दोन गटात विभागली आहे. त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असून, आमदार शेखर निकम यांनी विकासकामाच्या जोरावर या मतदार संघात पाळेमुळे रोवली आहेत. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निकम यांनी या गटात भारतीय जनता पक्षाच्या प्रशांत यादव यांच्यापेक्षा दोन हजार मतांची निर्णायक आघाडी घेतली होती. या गटात आमदार निकम यांचे खासगी स्वीय सहाय्यक संजय कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. आमदार निकम व त्यांचे कार्यकर्ते मतदार संघात कशा पद्धतीने प्रचार करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे. उबाठा गटाचे संतोष चव्हाण हे आमदार भास्कर जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत. ते सलग तिसऱ्यांदा आपले नशीब आजमावत आहेत. सत्ता नसल्याने त्यांच्याही कामांना मर्यादा आहेत. प्रत्येक उमेदवाराने वैयक्तिक गाठीभेटीवर जोर दिला आहे.
कुटरे गणात शिवसेना (उबाठा) गटाच्या नीशा घडशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनस्वी बैकर, शिवसेना ठाकरे गटाच्या अक्षता होवले व अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ यांच्यात चौरंगी लढत होत आहे. अपक्ष उमेदवार अर्चना रसाळ यांच्यामुळे अन्य उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. यांच्या मतविभागणीमुळे कोणत्या उमेदवाराला फटका बसू शकतो, हे पाहणे रंजक ठरणार आहे. कोकरे गणात प्राची घडशी या शिवसेना शिंदेगटाकडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उज्ज्वला घाग तर शिवसेना (उबाठा) गटाकडून उज्ज्वला चोगले उमेदवार आहेत. या उमेदवारांनी पत्रकांच्या माध्यमातून घरोघरी संपर्क साधून प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.
--------
चौकट
घाग यांची भूमिका महत्त्वाची
कोकरे गटात शिवसेना शिंदेगटाचे सिद्धार्थ कदम हे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे कार्यकर्ते समजले जातात. या गटातून किशोर घाग यांनी उमेदवारी मागितली होती; मात्र त्यांना डावलून सिद्धार्थ सावंत यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता; मात्र वरिष्ठांच्या मनधरणीनंतर त्यांनी माघार घेतली. त्यांची या निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ! 'या' ३ कारणांमुळे नितीश कुमार CM पदावरून हटणार; नवं सरकार कधी स्थापन होणार?

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update :मध्य रेल्वे मुंबई विभागात विनातिकीट प्रवास करणाऱ्या १६.१६ लाख प्रवाशांकडून १.३१ कोटी रुपये दंड वसूल बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

SCROLL FOR NEXT