rat१p१.jpg-
२६O२११७०
रत्नागिरी : अंजली बर्वे, स्नेहा सप्रे.
----
वेदमूर्ती सातवळेकर यांचे कार्य स्फूर्तिदायक
प्रा. अंजली बर्वे ः संस्कृत अध्ययन उपकेंद्रात चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १ : कोलगावातील (ता. सावंतवाडी) वेदमूर्ती पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी आयुष्यभर वेदांचा आणि संस्कृतचा प्रचार- प्रसार करण्यासाठी आणि त्याचे महत्त्व जनमानसात महत्प्रयासाने रुजावे, यासाठी कार्य केले. अशा वेदमूर्ती सातवळेकर यांचे कार्य स्फूर्तिदायक आहे, असे गौरवोद्गार व्याख्यात्या प्रा. अंजली बर्वे यांनी काढले.
सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य संस्कृत साहित्य अकादमी आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, राष्ट्रभावना रुजवण्यासाठी वेदमूर्ती सातवळेकर यांनी ८३ सूक्तांवर आधारित वैदिक राष्ट्रगीतांचे पुस्तक लिहिले. हरिद्वार येथे शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी वैदिक प्रार्थनांची तेजस्विता हा लेख लिहिला. वेद, उपनिषदे, भगवद्गीता यावरील भाष्य, वेदातील सर्पविज्ञान, कृषिविज्ञान यासारखे अनेक लेख लिहून वैदिक संस्कृती व संस्कृत भाषा यांच्या प्रचार प्रसाराला बळ दिले.
------
चौकट १
डॉ. काणे यांचे कार्य अद्वितीय
भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे यांनी धर्मशास्त्र विषयवार केलेले कार्य कालातीत आहे. ते नेहमीच निरंतर कार्यमग्न होते. त्यामुळे इंडोलॉजी व धर्मशास्त्राचे अध्ययन-अध्यापन चालू असेपर्यंत डॉ. काणे विसरले जाणार नाहीत, असे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथील स्नेहा सप्रे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.