कोकण

रस्ता कमी, खड्डेच जास्त!

CD

21305

रस्ता कमी, खड्डेच जास्त!

म्हापण-धांक मार्गाची दशा; पर्यटक, स्थानिकांकडून दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १ ः सध्या समुद्रकिनारी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस दिवस वाढत आहे; मात्र पायाभूत सुविधेमधील महत्त्वाचा दुवा मानला जाणारा म्हापण धंका हा सुमारे ३-४ किलोमीटर सागरी महामार्गाची अक्षरशः दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.
खवणे किनारा व वेंगुर्ले येथे जाण्यासाठी या या सागरी महामार्गाचा उपयोग केला जातो. या रस्त्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. छोट्यामोठ्या अनेक खड्ड्यांमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यावरून पर्यटकांना प्रवास करावा लागत आहे. कोल्हापूर, बेळगाव, रत्नागिरी, गोव्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळ्या राज्यांमधून तसेच देशविदेशातील पर्यटकांचा ओढा या ठिकाणी असतो. या मार्गावर खड्ड्यांचे जाळे निर्माण झाले असून म्हापण, मळई, खवणे मायणे केळस, वेंगुर्ले या ठिकाणी प्रवास करणे देखील जीव घेणे ठरत आहे. चालकांना आपला जीव मुठीत घेऊन वाहन हाकावे लागत आहे.
याच मार्गावर सध्या पर्यटन दृष्टीने नावारुपास आलेले खवणे बीच तसेच कयाक, कायाकिंग, कांदळवन सफारीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोडुरा कादंबरीमधील प्रसिद्ध किनारा, केळूस कालवी बंदर या पर्यटन ठिकाणी जाताना याच मुख्य रस्त्याचा वापर होतो; मात्र हजारो किलोमीटर अंतरावर येणाऱ्या पर्यटकांना मात्र खड्ड्यांमुळे धक्के खात पर्यटन स्थळांपर्यत पोहोचावे लागत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
.....................
कोट
अनेक महिन्यांपासून या रस्त्याची धुळधाण उडाली आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती केली जाईल असे समजले होते, परंतु अद्यापही रस्ता ‘जैसे थे’ असल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
- रोशन म्हापणकर, स्थानिक ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सामान्यांना दिलासा! पेट्रोल पंपावरून मिळणार रॉकेल; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, जाणून घ्या नवीन योजना आणि किंमत...

BCCI जसप्रीत बुमराहला २ कोटींची नुकसान भरपाई देणार; त्यांच्या एका निर्णयाने झालाय घोळ, करायला गेले एक अन् घडलं भलतंच...

Latest Marathi News Live Update : बालेवाडीत ढगांची गर्दी; रिमझिम पावसाची सुरुवात

Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

राहुल मोदीशी लग्न करणार श्रद्धा कपूर? मावशी तेजस्विनी कोल्हापुरेने दिली पहिली प्रतिक्रिया, हसल्या आणि म्हणाल्या-

SCROLL FOR NEXT