देवरूख शहराचा विकास आराखडा खुला
नागरिकांना हरकती मांडण्यास महिन्याची मुदत; जीआयएस प्रणालीने नकाशे
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १ ः गेली अनेक वर्षे प्रतीक्षेत असलेला देवरूख शहराचा विकास आराखडा भविष्यातील गरजा लक्षात घेऊन देवरूख नगर पंचायतीच्यावतीने तयार करण्यात आला आहे. कार्यालयीन वेळेत कार्यालयात हा आराखडा नागरिकांना पाहता येणार आहे. नागरिकांच्या काही हरकती असतील तर एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
देवरूख हे संगमेश्वर तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सर्व शासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालये, मुख्य बाजारपेठ देवरूख शहरात आहेत. याचा विचार करून भू वापर नियोजन, लोकसंख्या वाढ व्यवस्थापन, पायाभूत सुविधा, शिस्तबद्ध विकास, वाहतूक कोंडीसाठी ठोस वाहतूक व्यवस्था या सर्व उद्देशाने शहर विकास आराखडा तयार केला जातो.
नगर पंचायत कार्यक्षेत्रातील भौगोलिक माहिती जीआयएस प्रणाली वापरून तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन जमीन वापर नकाशा तयार करण्यात आला होता. प्रारूप विकास आराखडा तयार करून यावर नागरिकांची मते व सूचना देखील नगर रचना अधिकारी स्मिता कलकुटकी, मुख्याधिकारी विसपुते यांनी जाणून घेतल्या होत्या. भोसले नगर पंचायतीत संभाव्य शहर विकास आराखडा प्रकाशित करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष वैभव पवार, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी प्रशांत उपस्थित होते.
नगररचनाकार विराज बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली देवरूख शहराचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. विराज बोडस यांना रचना सहाय्यक सुधाकर गजबार व श्रद्धा कांबळे यांचे सहकार्य लाभले. हा आराखडा नागरिकांना पाहता यावा यासाठी नगर पंचायत कार्यालयात फलकावर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा आराखडा कार्यालयीन वेळेत नागरिकांना पाहता येणार आहे.
-----
कोट
नागरिकांच्या हरकती असतील तर एक महिन्याच्या आत लेखी स्वरूपात मांडाव्यात. या हरकतींवर देखील विचार विनिमय करण्यात येणार आहे. यानंतरच हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.
- प्रशांत भोसले , मुख्याधिकारी नगरपंचायत
---
*या बाबींचा आराखड्यात समावेश
---------------------------
* मुख्याधिकारी व कर्मचारी वसाहत
* बेघरांसाठी घरे, पशुवैद्यकीय दवाखाना
* प्राथमिक आरोग्य केंद्र, नाट्यगृह, बागबगिचा
* पिकनिक सेंटर,सार्वजनिक पाकींग
* भाजी मार्केट, मच्छी-मटण मार्केट
* प्ले ग्राऊंड, शहरातील रस्ता रुंदीकरण
* फेरीवाल्यांसाठी जागांची निश्चिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.