जय भीम मंडळाच्या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
चिपळूण, ता. : शहरातील पेठमाप येथील जय भीम विकास मंडळ, पेठमाप बौद्धवाडी यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन आज सकाळी नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते झाले. माजी नगरसेविका स्वाती दांडेकर आणि नगरसेवक प्रमोद बुरटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, तसेच नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात झाली.
या वेळी नगरसेवक विकी लवेकर, उद्योजक निकेश हरवंदे, निवृत्त तहसीलदार उल्हास कदम आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष सचिन कदम, नितीन कदम, अमित कदम, अभिजित कदम, साहिल कदम, तसेच मंडळाच्या सदस्यांनी केले. ही क्रिकेट स्पर्धा सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आली असून, क्रीडा स्पर्धा आयोजित करणे, ही अत्यंत अवघड गोष्ट असल्याचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.