- rat१p२६.jpg-
२६O२१३७७
खापणे महाविद्यालयात ‘जाऊ कवितेच्या गावा’ या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. विकास पाटील व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर
---
नवनिर्मिती हाच कवितेचा आत्मा
डॉ. विकास पाटील ः प्रत्येक कवितेत वेगळाच आशय
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १ ः कवीकडे असणारी प्रतिभा वाचकाला आपलेसे करून टाकते. कवितेला कोणताही विषय वर्ज्य नाही. प्रत्येक विषयात कवी आपल्या प्रतिमेचे रंग भरून एक नवे शब्दरूपी वस्त्र वाचकांच्या हाती करतो. कवीने केलेली नवनिर्मिती हाच कवितेचा आत्मा असल्याने वाचकांना कविता आवडते. आईसारख्या एकाच विषयावर असंख्य कविता लिहिल्या गेल्या पण त्या प्रत्येक कवितेत कवीने वेगळाच आशय भरला म्हणूनच नवनिर्मिती हा कवितेचा आत्मा आहे. अशी कवितेची नवनिर्मिती करण्यासाठी तरुणाईने पुढे यावे, असे आवाहन डॉ. विकास पाटील यांनी केले.
श्री मनोहर हरी खापणे महाविद्यालयात मराठी भाषा पंधरवड्या निमित्त ‘जाऊ कवितेच्या गावा’ या विषयावर बोलताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, कविता हा कमी शब्दात जास्त आशय प्रकट करणारा साहित्यप्रकार आहे. त्यामुळेच आपल्या व्यथा, वेदना प्रकट करण्यासाठी दलित साहित्यिकांनी हा प्रकार निवडला. उपलब्ध शब्द सामग्रीतून कवी आपल्या काव्याची गंधर्व नगरी फुलवत असतो. आपले प्रेम, विद्रोह, समाजभान, क्रोध, विस्मय, भय, भक्ती, शांती अशा विविध भावना प्रकट करण्यासाठी हा साहित्यप्रकार हाताळला जातो.
डॉ. बी. टी. दाभाडे यांनी कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट करत भाषा पंधरवड्या निमित्त घेतलेल्या उपक्रमांची माहिती दिली. यावेळी कु निसर्गा धावडे, डॉ.बी.टी. दाभाडे यांनी आपल्या कविता सादर केल्या. यानंतर संतोष संकपाळ यांनी मराठी कविता विविध चालीतून गाईल्या. शब्दांच्या अंगी अपार सामर्थ्य असते. हे सामर्थ्य कवीलाच कळते. आपल्या विद्यार्थी नवकवींनी हे सामर्थ्य ओळखून काव्य निर्मिती अखंड करत रहावे, असे आवाहन आपल्या अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.